Feb 7, 2023
किडनी स्टोन ही एक अतिशय सामान्य परंतु वेदनादायक समस्या आहे. व्यक्तीच्या एका किंवा दोन्ही मूत्रपिंडांमध्ये दगडांसारखे छोटे आणि कठीण तुकडे जमा होतात.
Credit: times-now
किडनी बीन्स हे दिसायला किडनीसारखे असते. किडनी बीन्स म्हणजे राजमा त्याला इंग्रजीत किडनी बीन्स म्हणतात. हे किडनीचे आरोग्य सुधारते आणि दगड तयार होण्यास प्रतिबंध करते. यासाठी फक्त राजमा पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून घ्या. हे पाणी दिवसातून अनेक वेळा प्या.
Credit: times-now
लिंबूपाणी हे अतिशय ताजेतवाने पेय आहे. लिंबूमध्ये सायट्रेट असते जे किडनीमध्ये कॅल्शियम स्टोन तयार होण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध करते. सायट्रेट मूत्रपिंडात असलेल्या लहान दगडांचे लहान तुकडे करते.
Credit: times-now
सेलरीचा रस नियमितपणे सेवन करणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकली जातात. मूत्रपिंडात तयार होणारे आणि जमा होणारे विष बाहेर काढण्याची ही खूप जुनी पद्धत आहे. हे संपूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे.
Credit: times-now
किडनी स्टोन काढण्यासाठी सफरचंदचे व्हिनेगरचा वापर करू शकता. यातील अॅसिटिक अॅसिड दगड वितळण्यासाठी उपयोगी आहे. या व्हिनेगरचे सेवन केल्यास किडनी स्टोन वितळून छोटा होण्यास मदत होत असते, आणि तो यूरिनच्या मार्गाने शरीरातून बाहेर पडतो.
Credit: times-now
तुळशीच्या पानांमध्ये अॅसिटिक अॅसिड असते, ते किडनी स्टोन तोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करत असते. तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
Credit: times-now
किडनीच्या आरोग्यासाठी अनेक शतकांपासून डाळिंबाचा रस वापरला जात आहे. डाळिंबाचा रस तुमच्या शरीरातील टॉक्सिन आणि स्टोन बाहेर टाकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे तुमची किडनी निरोगी ठेवतात आणि दगड तयार होण्यास प्रतिबंध करतात.
Credit: times-now
मुतखडाचा त्रास असल्यास दिवसाला नियमितपणे 8 ते 12 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. निर्जलीकरण हे एक किडनीस्टोन होण्याचं कारण आहे. तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या. ते खूप हलके, फिकट पिवळे असावे. जर ते गडद पिवळे लघवी असली तर हे निर्जलीकरणाचे लक्षण आहे.
Credit: times-now
Thanks For Reading!