Feb 3, 2023

BY: Sunil Desale

ही लक्षणे दिसल्यास समजून जा तुम्हाला लिव्हरची समस्या आहे

लिव्हर

लिव्हर आपल्या शरीरातील दुसरा महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हरला यकृत असे म्हणतात.

Credit: istock

लिव्हरचे कार्य

जेवल्यावर आपल्या शरीरातील अन्न पचवणे आणि त्यातील पोषक घटक वेगळे करण्याचं काम लिव्हर करतं. रक्तातील हानिकारक आणि विषारी पदार्थ फिल्टर करण्याचंही काम लिव्हर करतं.

Credit: pixabay

लिव्हरच्या समस्येचे लक्षण

यकृताची समस्या जाणवते तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. तर अनेकवेळा लक्षणे दिसूनही येत नाहीत.

Credit: istock

भूक न लागणे

शरीरात पित्त रस तयार करण्याचे काम यकृत करते, जे अन्न पचणासाठी मदत करते. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर भूक कमी लागते.

Credit: pexels

वजन कमी

जेव्हा यकृत चांगल्या पद्धतीने काम करत नाही तेव्हा शरीराचे वजन कमी होण्यास सुरुवात होते.

Credit: pexels

डोळे आणि नखे पिवळे होणे

जेव्हा यकृत योग्य पद्धतीने काम करत नाही तेव्हा लघवी पिवळी होते आणि डोळे, नखांचा रंगही पिवळसर होतो. याला कावीळ असेही म्हणतात.

Credit: istock

तोंडातून दुर्गंधी

लिव्हर निकामी झाल्यावर तोंडाची दुर्गंधी, वास येण्यास सुरुवात होते.

Credit: istock

उलटी

यकृताची समस्या असल्यास उलटी, मळमळ अशा समस्या जाणवतात.

Credit: istock

थकवा

जास्त प्रमाणात थकवा जाणवणे, कोरडी त्वचा, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येणे ही सुद्धा यकृत निकामी होण्याची लक्षणे असू शकतात.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दुधी भोपळ्याचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे, आजारपण होणार दूर

अशा आणखी स्टोरीज पाहा