Mar 4, 2023

BY: Sunil Desale

जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

असू शकतं आजारपणाचं लक्षण

तहान लागणे सामान्य गोष्ट आहे. मात्र, तुम्हाला जास्त तहान लागत असेल तर ते आजारपणाचे लक्षण असू शकते.

Credit: pexels

तोंड कोरडे पडणे

ज्यावेळी तोंड कोरडे पडते तेव्हा तोंडातील ग्रंथी लाळेचे उत्पादन कमी करतात. यामुळे लाळ जाड होऊ शकते.

Credit: istock

डायबिटीज

मधुमेहाची समस्या असाल्यास जास्त पाणी प्यायल्यानंतरही तहान लागू शकते.

Credit: istock

पॉलिडिप्सिया

या समस्येनेग्रस्त असलेल्या व्यक्तीला सातत्याने तहान लागते. कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय किंवा थंड वातावरण असले तरी तहान लागते.

Credit: istock

चिंता

चिंतेमुळे तोंड कोरडे होते आणि यामुळे तहान अधिक लागते.

Credit: pexels

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनमुळे शरीरात द्रव पदार्थाची कमतरता असते त्यामुळे शरीराची कार्ये सुरळीतपणे कार्य करू शकत नाही.

Credit: istock

अशक्तपणा

अशक्तपणामुळे शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. अशा परिस्थितीत आळस येतो आणि तहानही जास्त लागते.

Credit: istock

अपचन

तेलकट आणि मसालेदार अन्न पचायला जड जातात. त्यामुळे असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.

Credit: istock

किती पाणी पिणे आवश्यक

निरोगी व्यक्तीने दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक असते. काही ठराविक परिस्थितीत पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Tension आलंय ? या पद्धतीने कमी तुमची चिंता

अशा आणखी स्टोरीज पाहा