May 13, 2022
वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात, डाएट फॉलो करतात. पण यात योग्य लक्ष दिले तर नक्कीच लवकर वजन कमी होईल.
Credit: pexels
योगा किंवा व्यायाम करून दिवसाची सुरूवात करा. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.
Credit: pexels
अनहेल्दी ब्रेकफास्ट केल्याने वजन वाढतं. म्हणून नाष्ट्यात तेलकट पदार्थांऐवजी सुकामेवा, फळ आणि दहीचा समावेश करावा.
Credit: pexels
सफरचंद खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. पचसंस्था मजबूत होते आणि लठ्ठपणा दूर होतो.
Credit: pexels
वजन कमी करायचे असेल तर बाहेरचे जेवण टाळा. घरच्या खाण्यावर भर द्या.
Credit: pexels
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. दिवसाला ७ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
Credit: pexels
खाताना घाई करू नये. हळू हळू खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतं.
Credit: pexels
जेवल्यानंतरन बसून राहू नका. जेवल्यानंतर थोडे चाला, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Credit: pexels
प्रोटीनमुळे लवकर फॅट बर्न होतात, म्हणून जेवणात पनीर, अंडी, कडधान्ये, डाळ आणि चिकनचा समावेश करावा.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद