Feb 20, 2023

दररोज 10 हजार पावले चालण्याच्या ट्रिक्स

Rohan Juvekar

चाला आणि फिट राहा

दररोज किमान 10 हजार पावले चाला, शक्य असल्यास वेगाने चाला. चालाल तर फिट राहाल.

Credit: Times Network

जिने चढा

लिफ्ट वापरण्याऐवजी जास्तीत जास्त प्रमाणात जिन्यांचा वापर करा

Credit: Times Network

कोणत्या वेळी चालावे?

दररोज मॉर्निंग वॉक करा. दुपारी आणि रात्री जेवणानंतर किमान अर्धा तास चालण्याची सवय लावून घ्या. यामुळे अन्न पचनास मदत होईल आणि वजन नियंत्रणात राहील.

Credit: Times Network

लांबचा मार्ग

एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकट माहिती असला तरी मुद्दाम लांबच्या रस्त्याने चालत जा. या निमित्ताने चालण्याचा व्यायाम होईल.

Credit: Times Network

वाहन वापरणे टाळा

जिथे चालत प्रवास करणे शक्य आहे तिथे वाहन वापरणे टाळा. वाहन वापरणारच असाल तर सायकल चालवा. यामुळे प्रवासातून व्यायाम होईल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Credit: Times Network

पाणी

दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या.

Credit: Times Network

सार्वजनिक वाहतूक

प्रवासाकरिता खासगी वाहन वापरण्याऐवजी रेल्वे, मेट्रो, मोनो, बस या सार्वजनिक वाहतूक मार्गांचा वापर करा. या निमित्ताने जास्त चालणे होईल.

Credit: Times Network

शॉपिंग

शॉपिंगच्यावेळी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडण्याऐवजी स्वतः खरेदी केलेले सामान उचलून घरी आणा. यामुळे गरजेपुरते खरेदी करण्याची सवय लागेल आणि शॉपिंगच्या निमित्ताने नकळत व्यायाम होईल.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: निरोगी त्वचेसाठी खा हे सुपरफूड्स

अशा आणखी स्टोरीज पाहा