May 24, 2023

​तुळशीची पाने दररोज खा आणि आजार दूर ठेवा​

Sunil Desale

मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी लाभदायक

​तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच अनेक गंभीर आजारांवरही प्रभावी आहे.​

Credit: pexels

​कर्करोग प्रतिबंध​

तुळशीच्या पानांत रोझमॅरिनिक अ‍ॅसिड, एपिगेनिन, ल्यूटोलिन यासारखे फायटोकेमिकल्स असतात. यामुळे शरीराचे अनेक प्रकारच्या कर्गरोगापासून संरक्षण होते.

Credit: istock

​मधुमेह असलेल्यांसाठी औषध​

मधुमेहविरोधी गुणधर्मांमुळे दररोज सकाळी तुळशीच्या पाने मिसळलेले पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Credit: istock

​बद्धकोष्ठतेपासून दिलासा​

2 ग्रॅम तुळशीच्या बिया एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच या पानांच्या सेवनाने अपचनासारखी समस्या दूर होते.

Credit: istock

​यकृतासाठी फायद्याचे​

तुळशीच्या पानांत हायपो प्रोटेक्टिव गुण असतात. यामुळे तुळशीची पाने खाल्ल्याने यकृत निरोगी राहण्यास मदत होते.

Credit: istock

​हृदय मजबूत​

दररोज तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.

Credit: istock

​डोळ्यांसाठी फायद्याचे​

जर दररोज तुळशीची पाने खाल्ली तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या संबंधितील समस्यांपासून आराम मिळतो.

Credit: istock

​वजन कमी करण्यास मदत​

तुळशीची पाने खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामी तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

Credit: istock

​हिरड्यांसाठी फायद्याचे​

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ तुळशीत आढळतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जेवण तयार झाल्यावर मीठ टाकणे कितपत योग्य?

अशा आणखी स्टोरीज पाहा