Sunil Desale
Feb 24, 2023
आपल्यापैकी अनेकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या भेडसावत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करणं नुकसानदायक ठरू शकते. जाणून घ्या यावर उपाय...
Credit: i-stock
ड्राय आईज म्हणजे डोळे सुकण्याच्या समस्येमुळे डोळ्यातून पाणी येते. जेव्हा शरीरात पाणी, तेल याचे योग्य संतुलन बनत नाही तेव्हा असे होते.
Credit: i-stock
इन्फेक्शन, बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. अशा स्थितीत डोळे लाल होऊ शकतात आणि डोळ्यातून पाणी येऊ शकते.
Credit: i-stock
कफ, नाक वाहणे यासोबतच डोळ्यातून पाणी येणं हे एलर्जीच लक्षण आहे. अशा स्थितीत औषधांनी आराम मिळतो.
Credit: pexels
तुमच्या डोळ्यांना अधिक त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आय ड्रॉप घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काही घरगुती उपायही करु शकता.
Credit: i-stock
गरम पाण्यात एक रुमाल भिजवा आणि हलक्या हाताने डोळ्यांवर त्याने शेक द्या.
Credit: i-stock
काकडीचे छोटे, गोलाकार तुकडे करा आणि काहीवेळ डोळ्यांवर ठेवा. यामुळे काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळेल.
Credit: i-stock
टी बॅग 5 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. मग ते डोळ्यांवर ठेवा.
Credit: i-stock
कापसात गुलाब पाणी टाकून ते डोळ्यांवर ठेवा. यामुळे थंडावा आणि दिलासाही मिळेल.
Credit: i-stock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद