Mar 14, 2023

BY: Sunil Desale

​तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे​

आरोग्यावर परिणाम

तुम्ही सुद्धा ब्रश न करताच नाश्ता करता का? जाणून घ्या त्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो.

Credit: pexels

​दात खराब होणे

दीर्घकाळ ब्रश न करताच खाद्यपदार्थ खाल्ल्याने दात किडण्यास सुरुवात होऊ शकते आणि दातदुखीची समस्याही उद्भवते.

Credit: istock

​तोंडातून दुर्गंधी

ब्रश न करता खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयीमुळे तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी तोंडातून दुर्गंधीची समस्या सुरू होते.

Credit: istock

​हिरड्यांवर परिणाम

जर तुम्हाला आपल्या हिरड्या मजबूत आणि निरोगी ठेवायच्या असतील तर सकाळी ब्रश केल्यावरच खाद्यपदार्थ खा.

Credit: istock

​पिवळे दात

ब्रश न करता खाण्याच्या सवयीमुळे दात पिवळे होण्याची समस्या उद्भवू शकते.

Credit: istock

पाणी प्यावे की नाही?

प्रश न करता काही खाऊ नये मात्र, तुम्ही पाणी पिऊ शकता. यामुळे आरोग्याला अनेक आरोग्यदायक फायदे मिळतात.

Credit: istock

​किडनी​

सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने किडनी मजबूत होण्यास मदत होते. इतकेच नाही तर किडनीच्या संबंधित समस्याही दूर होऊ शकतात.

Credit: istock

केसांसाठी

चांगले केस हवे असतील तर सकाळी रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या.

Credit: istock

​कधी खावे?

ब्रश केल्यावर 20 ते 30 मिनिटांनी खाद्यपदार्थ खावे. ब्रश केल्यावर लगेचच खाणे टाळावे.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दात न घासता पाणी प्या, हे होतील फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा