लवकर म्हातारे व्हायचे नसेल तर तुमच्या अन्नाचा वृद्धत्वाशी असलेला संबंध जाणून घ्या

Vijay Tawde

Sep 22, 2022

वृद्धत्वाची प्रक्रिया

वृद्धत्व अपरिहार्य आहे. परंतु अलीकडील अभ्यासाने असे लक्षात आणून दिले आहे की अन्न आणि वृद्धत्वाची प्रक्रिया यात जवळचा संबंध आहे.

Credit: iStock

वाढत्या वयाशी संबंधित रोग

वृद्धत्वात सर्वात मोठा हातभार लावणारा घटक म्हणजे वयाशी संबंधित आजार. त्यामुळे योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Credit: iStock

20 वर्षांमध्ये गोळा केलेली माहिती

हा अभ्यास 20 वर्षांच्या कालावधीत आणि 30 वर्षांहून अधिक क्लिनिकल आणि शारीरिक मूल्यमापनांच्या आधारे करण्यात आला होता.

Credit: iStock

शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे

ज्या लोकांनी आयुष्यात पूर्वी अक्रोडाचे सेवन केले होते त्यांच्या वयानुसार ते शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय असण्याची शक्यता जास्त आहे.

Credit: iStock

अक्रोड

अक्रोड हे वनस्पती आधारित ओमेगा -3 अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिडचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. त्यामुळे हृदयाचे आरोग्य, निरोगी मेंदूचे कार्य आणि निरोगी वृद्धत्वासाठी मदत होते.

Credit: iStock

सहज उपलब्ध

अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की अक्रोड हे सहज उपलब्ध असते. त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

Credit: iStock

फक्त मूठभर

या शोधाचा आश्चर्यकारक पैलू असा आहे की नियमितपणे फक्त मूठभर अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला मोठे फायदे होतात.

Credit: iStock

वनस्पती आधारित जेवण

वृद्धत्वाच्या प्रक्रियेस धीमे करणारे आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे काही इतर महत्त्वाचे घटक म्हणजे कॅल्शियम समृध्द अन्न, तंतुमय पदार्थ आणि वनस्पती-आधारित जेवण.

Credit: iStock

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

संशोधकांनी ताज्या अन्नावर विशेष भर दिला आहे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर कमी करण्यास सांगितले आहे.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: नखं खाणं तुम्हाला पडू शकतं भारी!