12 आर्टमध्ये केली,आता पुढे काय करायचं प्रश्न पडलाय

Apr 14, 2023

Times Network

​करिअरविषयी चिंता

12वी नंतर विद्यार्थ्यांना करिअरविषयी चिंता होऊ लागते. खास करून आर्ट्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो.

Credit: Times Now

​कोणते कोर्सेस कराल​

जर तुम्ही पण आर्ट्स घेतले असेल तर 12वी नंतर तुम्ही कोणते कोर्स करू शकता याविषयी आज आपण जाणून घेऊ..

Credit: pexels-com

B.A

बॅचलर ऑफ आर्टमध्ये तुम्ही इंग्लिश, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी विषय घेऊन ग्रॅज्युएशन करू शकता.

Credit: pexels-com

बॅचलर इन फॅशन डिझायनिंग​

जर फॅशन क्षेत्रात रस असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. यात तुम्ही नाव आणि पैसे दोन्ही मिळवू शकता.

Credit: pexels-com

​BA LLB​

हा 12वी नंतरचा पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही वकिली क्षेत्रात करिअर करू शकता.

Credit: pexels-com

​टूर ऍण्ड ट्रॅव्हल्स​

तुम्ही ट्रॅव्हल ऍण्ड टुरिजम मॅनेजमेंटमध्ये बीए, टूर ऍण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये बीबीए, टुरिजम स्टडीजमध्ये बीए यांसारखे कोर्स देखील करू शकता.

Credit: pexels-com

​BJMC

बॅचलर ऑफ जर्नालिजम ऍण्ड मास कम्युनिकेशन करून तुम्ही रेडिओ, फिल्म मेकिंग, सिनेमॅटोग्राफी, क्रिएटिव्ह रायटिंग यांसारख्या क्षेत्रात करिअर करू शकता.

Credit: pexels-com

You may also like

या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकं...
Daily Horoscope : आज शनिदेव या तीन राशी...

BBA​

बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स किंवा इतर कोणत्या क्षेत्रात स्पेशिअलायझेशन करू शकता.

Credit: pexels-com

BFA

या कोर्सचे पूर्ण नाव बॅचलर ऑफ फाईन आर्टस् आहे. यात चित्रकला, मूर्तिकला, फोटोग्राफी यांसारखे विषय शिकवले जातात.

Credit: pexels-com

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती

अशा आणखी स्टोरीज पाहा