अरेंज मॅरेज करण्यापूर्वी हे 7 प्रश्न नक्की विचारा
Sunil Desale
लग्नाचा निर्णय
आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे लग्न. त्यातही अरेंज मॅरेज असेल तर मुलगा असो किंवा मुलगी दोघांच्याही मनात अनेक प्रश्न असतात.
Credit: Pexels
अरेंज मॅरेज
सध्याच्या काळात लग्नाआधी मुलं-मुली एकमेकांना भेटतात आणि चर्चा करतात. मात्र, काही प्रश्न असे असतात जे भावी जोडीदाराला विचारणं गरजेचं असतं.
Credit: Pexels
काय आहेत हे प्रश्न?
जर तुम्ही अरेंज मॅरेज करु इच्छिता तर तुमच्या भावी जोडीदाराला हे 7 प्रश्न नक्की विचारा. जेणेकरुन तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.
Credit: Pexels
पहिला प्रश्न
मुलगा असो किंवा मुलगी दोघांच्याही आवडी-निवडी एकमेकांना विचारल्या पाहिजेत. यावरुन लग्नाची बोलणी पुढे सरकवायची की नाही हे आपण ठरवू शकतो.
Credit: Pexels
दुसरा प्रश्न
दुसरा प्रश्न म्हणजे आपला भावी जोडीदार व्हेज खाणारा आहे की नॉनव्हेज खाणारा आहे. कारण, जर तुमचा जोडीदार व्हेज खाणारा असेल आणि तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर लग्नानंतर अडचणी येऊ शकतात.
Credit: Pexels
तिसरा प्रश्न
भविष्यातील जोडीदाराकडून सिक्युरिटीजबद्दल विचारण्याची खात्री करा. असे होऊ नये की, तुमचा भावी जोडीदार हा आपल्या आयुष्याच्यासंदर्भात असुरक्षित असेल.
Credit: Pexels
चौथा प्रश्न
भावी जोडीदाराला त्याच्या घरातील चालीरिती, परंपरा, संस्कृती या सर्वांच्याबद्दल विचारा. त्याच्या घरातील परंपरा वेगळ्या असतील तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
Credit: Pexels
You may also like
लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय...
राशीभविष्य 7 एप्रिल : आज या राशीच्या व्य...
पाचवा प्रश्न
जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला असाल तर तुमच्या करिअरबद्दल नक्कीच प्रश्न विचारा. अनेकदा लग्नानंतर करिअर किंवा नोकरी हे पती-पत्नीतील भांडणाचे कारण बनते.
Credit: Pexels
सहावा प्रश्न
आपल्या भावी जोडीदाराला सर्व चांगल्या आणि वाईट सवयींबद्दल विचारा. याद्वारे तुम्हाला समोरील व्यक्तीचा स्वभाव कळू शकेल.
Credit: Pexels
सातवा प्रश्न
अरेंज मॅरेज करण्यापूर्वी भावी जोडीदाराला त्याच्या फ्यूचर प्लानिंगच्या संदर्भात विचारा. यावरुन त्या व्यक्तीची भविष्यातील प्लान्स काय आहेत हे तुमच्या लक्षात येईल.
Credit: Pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे