Feb 10, 2023

BY: Sunil Desale

धीरेंद्र शास्त्री आणि बागेश्वर धामचा पैसा येतो कुठून?

बागेश्वर धाम चर्चेत

बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूपच चर्चेत आहेत. त्यांचे माध्यमांत नाव येताच त्यांच्या बागेश्वर धाममध्ये भेट देणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे.

Credit: Facebook

केलीय ही घोषणा

बागेश्वर धामने घोषणा केलीय की, कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन ते कॅन्सरग्रस्तांसाठी रुग्णालय बनवत आहेत आणि याच महिन्यात 121 गरीब मुलींचा नि:शुल्क विवाह करुन देतील.

Credit: Facebook

पैसे कुठून येणार?

बागेश्वर धामने इतकी मोठी घोषणा केली आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, हे सर्व करण्यासाठी पैसे येणार कुठून? कारण, ते दक्षिणेशिवाय काम करतात.

Credit: Facebook

दुकानाचे भाडे

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, हायवे पासून 5 किलोमीटर परिसरात बागेश्वर धामच्या जवळपास असलेल्या शेतांमध्ये तंबू लावून अनेक दुकाने भाड्याने दिली आहेत. ज्याचं भाडं 60 हजार ते एक लाख रुपये महिना इतके आहे.

Credit: Facebook

धीरेंद्र शास्त्रीच्या कुटुंबाची जमीन

दैनिक भास्करच्यानुसार, हे संपूर्ण भाडं धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना मिळतं. कारण, बहुतांश जमीन ही त्यांच्या परिवाराची आहे.

Credit: Facebook

ऑनलाईन दान

बागेश्वर धामच्या आतमध्ये एक दानपेटी आहे त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन पेमेंटसाठी स्कॅन कोड सुद्धा लावण्यात आले आहेत. ​

Credit: Facebook

पार्किंगमधून कमाई

दैनिक भास्करच्या मते, येथे पार्किंगमधून दररोज 50000 ते 1 लाख रुपये कमाई होते. पार्किंगचं कंत्राट धीरेंद्र शास्त्री यांचा चुलत भाई लोकेश याने 33.18 लाख रुपयांत घेतला होता.

Credit: Facebook

बाहेरील दुकाने

या ठिकाणी भाडे जास्त असल्याने बहुतांश दुकाने इतर राज्यांतील लोकांची आहेत. जे हजारोंपासून ते लाख रुपयांपर्यंत भाडे प्रतिमाह देतात.

Credit: Facebook

धीरेंद्र शास्त्रींच्या नावावर जमीन नाही

धीरेंद्र शास्त्री सांगतात की, आमची कोणतीही जमीन नाही. माझ्या नावावर नाही आणि माझ्या वडिलांच्याही नावावर किंवा परिवाराच्या नावावरही नाही.

Credit: Facebook

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: केसात कोंडा झाल्यास या गोष्टींची घ्या काळजी

अशा आणखी स्टोरीज पाहा