या टिप्स वापरा अन् मुलांच्या मनातून रात्रीची भीती करा दूर

Sunil Desale

Jan 24, 2023

रात्री मुले घाबरतात

रात्रीची भीती ही मुलांना एका भयंकर अशा स्वप्नासारखी वाटते. अशा परिस्थितीत मुले भयानक अशा स्वप्नात अडकतात.

Credit: pexels

काय आहेत लक्षणे

रात्री ओरडणे, खूप रडणे, जोरजोरात श्वास घेणे आणि प्रचंड घाम येणे याचा अर्थ असा आहे की, तुमचं बाळ रात्री भीतीने घाबरलेलं आहे.

Credit: pexels

ही कारणे असू शकतात

अनेकदा लहान मुले भीतीदायक स्वप्न पाहतात. वाईट स्वप्ने, तणाव किंवा थकवा यामुळे लहान मुले रात्री घाबरतात.

Credit: pexels

असा करा बचाव

कधीही मुलांना एका झटक्यात असे उठवू नका. असे केल्याने मुले आणखी घाबरतात.

Credit: pexels

मुलांना झोपेतून कसे उठवावे

मुलांना झोपेतून उठवायचे असेल तेव्हा त्याला मिठीत घ्या. डोक्यावरुन हात फिरवा जेणेकरुन त्याला सुरक्षित वाटेल.

Credit: pexels

नाईट लॅम्प

लहान मुले वेगळ्या बेडरूममध्ये झोपत असतील तर बेडरूममध्ये नाईट लॅम्प लावा.

Credit: pexels

शांत वातावरण

मुले ज्या ठिकाणी झोपतील त्या ठिकाणी वातावरण शांत असावे. यामुळे मुलांना चांगली शांत झोप येईल.

Credit: pexels

झोपण्यापूर्वी टॉयलेट

झोपण्यापूर्वी मुलांना नेहमी वॉशरूममध्ये घेऊन जा. कधीकधी मुले भीतीमुळे लघवी रोखून ठेवतात जे योग्य नाही.

Credit: pexels

चांगली गोष्ट ऐकवा

झोपण्यापूर्वी मुलांना टीव्ही किंवा मोबाइल पहायला देऊ नका. तर त्यांना एखादी चांगली गोष्ट ऐकवा जेणेकरुन तो विचारात मग्न होईल आणि शांत झोपेल.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जेवणात चुकून तिखट जास्त झाले तर काय करायचं?

अशा आणखी स्टोरीज पाहा