सणासुदीच्या दिवसांत तेल, तूप, दूध, मावा यांचा वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापर होतो. याच काळात भेसळयुक्त पदार्थ बाजारात येण्याचे प्रमाण वाढते. यामुळे बाजारातून खरेदी करताना तुपाचा खरेखोटेपणा तपासणे आवश्यक आहे.
Credit: Times Network
भेसळयुक्त पदार्थ खाणे अपायकारक
भेसळ केलेला पदार्थ कळत नकळत खाल्ला तर शरीराला अपाय होण्याचा धोका असतो यामुळे खरेदी केलेल्या पदार्थात भेसळ झाली आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे.
Credit: Times Network
शुद्ध तूप कसे ओळखावे?
शुद्ध तूप सोनेरी रंगाचे अथवा पिवळ्या रंगाचे असते. शुद्ध तूप किंचित खरखरीत असते. शुद्ध तुपाचे टेक्स्चर कधीही स्मूथ अर्थात गुळगुळीत नसते.
Credit: Times Network
शुद्ध तुपाचे टेक्स्चर
शुद्ध तुपाचे टेक्स्चर किंचित खरखरीत किंवा दाणेदार असते. टेक्स्चरचा रंग निरखून बघितल्यास थोडा पांढरा दिसतो.
Credit: Times Network
कृत्रिम तूप
कृत्रिम तुपात सुगंधासाठी काही रसायनांचा वापर होतो तसेच हे तूप दीर्घ काळ टिकावे यासाठी त्यात प्रीझर्व्हेटिव्हज टाकली जातात.
Credit: Times Network
घरगुती तूप
घरी तयार केलेल्या तुपाला कढवल्याचा वास येतो पण कृत्रिम तुपापेक्षा हा वास वेगळा असतो.
Credit: Times Network
तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याची सोपी पद्धत
दुकानातून घेतलेले तूप हातावर ठेवा ते विरघळू लागले तर खरे समजा पण तसे होत नसेल तर लगेच परत करा.
Credit: Times Network
आयोडिन चाचणी
तुपात 2 चमचे आयोडिन टाका. तुपाचा रंग पर्पल अर्थात जांभळा झाला तर ते तूप खरेदी करणे टाळा.
Credit: Times Network
साखरेची चाचणी
तुपात साखर मिसळा आणि तूप व्यवस्थित ढवळा. जर तुपाचा रंग लाल किंवा लालसर झाला तर ते तूप खरेदी करणे टाळा.
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात