May 1, 2022
बंगळुरूतील कमर्शियल स्ट्रीट हा बजार नेहमीच गर्दीने फुललेला असतो. या बाजारात कपडे, दागिने आणि चपला चांगल्या दरात मिळतात.
Credit: Wikipedia
राजधानी दिल्लीतील सरोजिनी नगर हा बाजार फार सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या बाजारात मोठ्या डिस्काऊंटमध्ये कपडे मिळतात म्हणून शनिवारी रविवारी या बाजारात एकच गर्दी असते.
Credit: Facebook
कोलकाताच्या लिंड्से मार्गावरील बाजाराला पूर्वी सर स्टुअर्ट मार्केट म्हणून ओळखले जायचे. या बाजारात २ हजारहून अधिक दुकाने आहेत.
Credit: Wikipedia
अहमदाबादमध्ये दर रविवारी हा बाजार भरतो, म्हणून या आठवडी बाजाराला रविवारी बाजार असे नाव पडले. या बाजारात मोठ्या प्रमाणात सेकंड हँड वस्तू आणि अँटीक वस्तू मिळतात.
Credit: Instagram
आपल्या मुंबईत अनेक बाजारांपैकी असलेला कुलाबा कॉजवे हा एक बाजार आहे. या बाजारात दागिने, बॅग्स, सनग्लासेस सारख्या वस्तू वाजवी दरात मिळतात.
Credit: Wikipedia
दिल्लीतील जनपथ बाजार हे ७० वर्षांहून जुने आहे. इथे फॅशनसंबंधित अनेक वस्तू स्वस्तात मिळतात.
Credit: Facebook
जर तुम्ही गोव्यात जाणार असाल तर या बाजाराला आवर्जून भेट द्या. उन्हाळ्यातील चांगले कपडे, बॅग्स या बाजारात मिळतात.
Credit: Instagram
चेन्नईच्या तीन किलोमीटर परिसरात हा बाजार पसरलेला आहे. या बाजारात कपडे, घड्याळ, चपला अशा अनेक वस्तू मोठ्या डिस्काऊंटमध्ये मिळतात.
Credit: Wikipedia
चारमिनार जवळ असलेला हा बेगम बाजार सर्वात मोठ आणि सर्वात जुना बाजार आहे. या बाजरात मसाल्यांपासून कपडे, चपला अशा अनेक वस्तू इथे मिळतात.
Credit: Wikipedia
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा