Sep 19, 2023

तळ कोकणात गणपतीला पहिले 5 दिवस दिला जातो असा नैवेद्य

Times Now Marathi

कोकणात जपली जाते अनोखी परंपरा...

Ganesh Chaturthi 2023: सध्या राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. घरोघरी गणेश मूर्तीची स्थापना केली जात आहे. कोकणात आजही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.

Credit: Social-Media

​गोडाधोडाचा नैवेद्य

कोकणातील ही प्रथा अगदी अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे म्हटले जाते. गणपतीला पाच दिवस गोडाधोडाचा नैवेद्य दिला जातो.

Credit: Social-Media

​कांदा, लसूण अजिबात नाही

5 भाज्या (कोणत्याही) कांदा, लसूण कोणत्याच पदार्थांमध्ये 5 दिवस नाही.. चला तर मग पाहूया पहिल्या पाच दिवसांचा नैवेद्य..

Credit: Social-Media

पहिला दिवस- मोदक

वरण-भात, काळ्या वाटाण्याची आमटी.

Credit: Social-Media

दुसरा दिवस- अळूची भाजी

अळूची भाजी (कम्पलसरी) याशिवाय कोणतीही 2 भाजी, खीर- पुरी, वरण- भात, कोणत्याही कडधान्याची आमटी (चण्याची डाळ, चवळी) लोणचं, पापड, कोशिंबीर.

Credit: Social-Media

तिसरा-चौथा दिवस- कोणताही आवडीचा गोड पदार्थ

2 भाज्या, वरण- भात, गुलाबजाम, कडधान्याची आमटी, मालवणी वडे, (उडदाची डाळ, धणे- मेथी, गहू, ज्वारी, तांदूळ या गोष्टी प्रमाणात घेऊन केलेलं पीठ), लोणचं, पापड, कोशिंबीर.

Credit: Social-Media

पाचवा दिवस- अळूच्या भाजी, खीर- वडे

लाल कंदमुळ, आंबाडा, उकडलेले शेंगदाणे, कोकम, मका, खोबरं (या गोष्टी कम्पलसरी), चार भाज्या कोणत्याही, खीर+ वडे (कम्पलसरी), वरण- भात, काळ्या वाटाण्याची आमटी, लोणचं, पापड, कोशिंबीर.

Credit: Social-Media

You may also like

त्वचेसाठी कसा फायदेशीर आहे भोपळा
​Ganesh Chaturthi 2023: एका क्लिकवर घ्या...

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: त्वचेसाठी कसा फायदेशीर आहे भोपळा

अशा आणखी स्टोरीज पाहा