Jun 3, 2023
BY: Sunil Desaleप्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की तो एकदिवस कोट्याधीश बनेल. मात्र, प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होत नाही.
Credit: iStock
कोट्याधीश बनणं हे तुम्ही किती मेहनत करता यावर अवलंबून असतं. तुम्ही किती सेव्हिंग करता आणि कुठे गुंतवणूक करता यावर सुद्धा हे अवलंबून असतं.
Credit: iStock
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही सेव्हिंग सुद्धा करत असाल हे नक्की आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमची सेव्हिंग कुठे गुंतवता आणि त्यातून किती परतावा मिळतो हे महत्त्वाचे आहे.
Credit: iStock
जर तुम्ही तुमचे पैसे सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवून त्यावर व्याज मिळेल अशी अपेक्षा करता तर ती मोठी चूक आहे. असे करणे म्हणजे तुम्ही आपला पैसा वाया घालवत आहात.
Credit: iStock
जर तुम्हाला सेव्हिंगमधून कोट्याधीश बनायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला फॉलो करावा लागेल.
Credit: iStock
या फॉर्म्युल्यात तुम्हाला 50:30:20 हा नियम फॉलो करावा लागेल. उदाहरणार्थ तुमचा पगार 30000 रुपये आहे तर तुम्हाला 50 टक्के खर्चासाठी, 30 टक्के आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तर 20 टक्के भाग गुंतवणूक करण्यासाठी वापरा.
Credit: iStock
30,000 रुपये पगार असलेल्या व्यक्तीने आपल्या पगारातील 15 हजार रुपये घर खर्चासाठी, ट्रॅव्हल आणि इतर खर्चासाठी वापरावे, 9000 रुपये आपल्या लग्जरी वस्तूंमध्ये गुंतवणूक करावी.
Credit: iStock
जर तुमचं वय 30 वर्षे आहे तर 30 हजार पगारातील 20 टक्के रक्कम एसआयपी, म्युच्युअल फंड आणि सेव्हिंग फंडमध्ये वापरावी. यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स नक्की मिळतील.
Credit: iStock
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 6000 रुपये म्युच्युअल फंड 25 वर्षापर्यंत गुंतवणूक कराल तर 15 टक्के रिटर्न यानुसार तुम्हाला 1,79,04,442 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच एकूण परतावा 1,97,04,442 कोटी रुपये असेल.
Credit: iStock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद