Apr 11, 2022
भेसळीची समस्या ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. स्वयंपाक घरातील दूध, तूप, साखर सर्व पदार्थांमध्ये भेसळ होत असते.
Credit: iStock
भारतीय भारतीय अन्न आणि मानक प्राधिकरणने चांगली आणि बनावट मिरचीची ओळखण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. एफएसएसआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Credit: iStock
मिरची पावडरमध्ये विटेचे पावडर, मीठ आणि पाणीमध्ये मिश्रित होणारे पदार्थ मिसळले जातात. हे आरोग्यासाठी आहे नुकसानकारक
Credit: iStock
सर्वात आधी एका ग्लासभर पाण्यात एक चमचा मिरची पावडर टाका. मिरची पावडरला चमच्याने हलवू नये, परंतु मिरचीला पाण्यात आपोआप ग्लासच्या तळाशी जाऊ द्या.
Credit: iStock
ओल्या झालेल्या मिरची पावडरला हातात घेऊन त्याला हलक्या हाताने चोळा. हातात चोळल्यानंतर तुमच्या हाताला काही खरबडापणा जाणवला तर समजून घ्या की यात भेसळ आहे.
Credit: iStock
जर ओल्या मिरची पावडर मऊ लागत असेल तर समजून घ्या की यात साबणाची पावडर मिसळण्यात आली आहे.
Credit: iStock
मिरची पावडरमध्ये टिंचर आयोडीन किंवा आयोडीन सॉल्यूशनचे काही थेंब त्यात टाका. जर ड्रॉप्स पावडरमध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग निळा होईल. तर समजून घ्या की, पावडरमध्ये स्टार्च आहे. अशा जास्त स्टार्च असलेले मसाले वापरु नये.
Credit: iStock
मिरची पावडरमध्ये विटेची पावडर मिश्रित आहे का नाही याची पडताळणी करण्यासाठी एका ग्लास घ्या आणि ग्लासच्या खाली थोडीशी मिरची पावडर घासा. मिरची पावडर घासताना जर तुम्हाला खरबडीतपणा जाणवेल तर समजून घ्या की यात विटेची पावडर मिश्रित आहे.
Credit: iStock
अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घ्या. जर मिरची पाण्यात मिसळली गेली किंवा पाण्याचा रंग गडद लाल झाला असेल तरत समजून घ्या की, तुमची मिरची पावडर मिश्रित आहे.
Credit: iStock
जर लाल मिरची पावडरमध्ये मिश्रण असल्याची भिती तुम्हाला वाटत असेल तर हिरवी मिरची वापरावी.
Credit: iStock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा