Feb 24, 2023

BY: Sunil Desale

सासरवाडीत वापरा या टिप्स, सासू झटक्यात होईल इम्प्रेस

आई सारखं प्रेम

लग्नानंतर सासूसोबत जुळवून घेण्यासाठी नव्या सूनेला अनेक गोष्टी कराव्या लागतात. आपल्या सासूने आईसारखेच आपल्यावर प्रेम करावे असं वाटत असेल तर तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Credit: pexels

आदर करा

आपल्या सासूचा नेहमी आदर करा. त्या सांगत असलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्रेमाने समजून सांगा.

Credit: i-stock

शांतपणाने चर्चा करा

शांतपणे आणि प्रेमाणे वागा. आपल्या सासूला काय हवे आहे याबाबत विचारणा करा. तसेच त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

Credit: i-stock

आजी आणि मुलांचे नाते

आपल्या मुलांना समजवून सांगा की आपल्या आजीसोबत कसे वागावे, आजीची काळजी कशी घ्यावी. यामुळे सासू नेहमी आनंदी राहील.

Credit: i-stock

वेळ द्या

जितके होईल तितका वेळ सासूला द्या आणि सासूसोबत मिळून असे काही करा की जे तुमच्या दोघांच्याही आवडीचे असेल.

Credit: i-stock

सरप्राईज

आपल्या सासूची आवड-निवड ओळखा आणि विशेष प्रसंगी सासूला खास सरप्राईज द्या.

Credit: i-stock

पतीसंदर्भात

तुमच्यात आणि पतीमध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या सासूला सांगणे आवश्यक असेल तर ते सांगा. यामुळे सासूचा तुमच्यावरील विश्वास अधिक वाढेल.

Credit: i-stock

फेवरेट डिश

जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आपल्या सासूच्या आवडीचं जेवण बनवा. यामुळे सासू अधिक खुश होईल.

Credit: i-stock

घराची जबाबदारी

घर सांभाळणे सोपं नसतं. मात्र, तुम्ही सुरुवातीपासून घराची जबाबदारी समजून घेतली तर सासू खूपच आनंदी होईल.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कमी तेलात अशी बनवा कुरकुरीत भजी

अशा आणखी स्टोरीज पाहा