कमी तेलात अशी बनवा कुरकुरीत भजी

Sunil Desale

Feb 23, 2023

जास्त तेलाची गरज नाही

जास्त तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळेच अनेकजण भजी खाणे टाळतात. जाणून घ्या कमी तेलात भजी कशी बनवायची.

Credit: pexels

तेल किती गरम

तेल जास्त गरम करू नका आणि जास्त थंडही नको. थंड तेलात भजी अधिक तेलकट बनतील आणि गरम तेलात आतमधून कच्ची राहील.

Credit: pixabay

मीठ

तेलात मीठ टाकून मग भजी तळली तर चांगली चव येईल आणि तेलही कमी लागेल.

Credit: pexels

तेल किती गरम तपासा

तेलाला एक काठी लावून पाहा. बुडबुडे येण्यास सुरुवात झाली तर समजून जा की भजी तळण्यासाठी तेल तयार झाले आहे.

Credit: i-stock

नॉन स्टिक पॅन

नॉन स्टिक पॅनमध्ये भजी तळून पाहा. यामुळे कमी तेलात तळलेली भजी तुम्ही खाऊ शकता.

Credit: i-stock

अप्पम मेकर

आईल फ्री भजी बनवण्यासाठी तुम्ही अप्पम मेकरचा वापर करु शकता. यासाठी अप्पम तयार करण्याच्या भांड्यातील सर्व साच्यात तूप किंवा तेल लावा.

Credit: i-stock

टिश्यू पेपर

कढईतून भजी बाहेर काढल्यावर टिश्यू पेपरमध्ये चांगल्याप्रकारे दुमडून ठेवा. त्यानंतर त्यावर थोडा दबाव टाका.

Credit: i-stock

शेलो फ्राय

भजी शेलो फ्राय करा. यामुळे टेस्ट चांगली येईल आणि जास्त तेलही लागणार नाही.

Credit: i-stock

कमी बेसन

भजीला जास्त बेसन वापरले तर ते जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे पिठ जास्त घट्ट न करण्याऐवजी हलकासा असा लेप घ्या.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: राशीभविष्य 24 फेब्रुवारी : जाणून घ्या आजचा शुक्रवार 12 राशींसाठी कसा

अशा आणखी स्टोरीज पाहा