Mar 18, 2023

पापमोचनी एकादशी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

Rohan Juvekar

कधी आहे पापमोचनी एकादशी?

पापमोचनी एकादशी 2023 : शनिवार 18 मार्च 2023. शुक्रवार 17 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी तिथी आरंभ आणि शनिवार 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी तिथी समाप्ती

Credit: Times Network

महाराष्ट्रातले पंचांग काय सांगते?

​महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अकराव्या दिवसाला अर्थात एकादशी या तिथीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. यंदा शनिवार 18 मार्च 2023 रोजी पापमोचनी एकादशी आहे. ​

Credit: Times Network

महत्त्वाची तिथी

पापमोचनी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वाधिक महत्त्वाची तिथी समजली जाते. या दिवशी मनोभावे विष्णू देवाची पूजा केली आणि व्रत पाळले तर पुण्य लाभते. सुखांचा लाभ होतो. अडचणी आणि संकटे दूर होतात. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

Credit: Times Network

व्रताचे फायदे

पापमोचनी एकादशी या दिवशी केलेले व्रत आरोग्य, संतानप्राप्ती, प्रायश्चित यासाठी महत्त्वाचे आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा संरक्षक. चांगल्याचे रक्षण करणारा देव. विष्णूचा अवतार अर्थात भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः युधिष्ठीर आणि अर्जुन या दोघांना पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते; असे सांगतात. पापमोचनी एकादशीला केलेल्या व्रताने ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर करण्यास मदत होते.

Credit: Times Network

पती पत्नीने कसे करावे व्रत

पापमोचनी एकादशीचे व्रत करण्यासाठी पहाटे उठून पती आणि पत्नी या दोघांनी आंघोळ करून घ्यावी. नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या (राई) तेलाचा दिवा लावा. कारण पिंपळाच्या झाडावर ब्रह्मदेव, विष्णूदेव आणि महेश अर्थात भगवान शंकर यांचे वास्तव्य असते असे सांगतात.​

Credit: Times Network

अशी करावी पूजा

एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सुर्योदयापूर्वी उठावे आणि आंघोळ करून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूची पुजा करावी. भगवान विष्णूला धूप, चंदन आणि फळ अर्पण करून दिवा लावावा. देवाची व्रत कथा ऐकावी आणि आरती करावी. गरजूंना दान करावे. अन्नदान करावे. एकादशीच्या काळात देवाची आराधना करावी. व्रत काळात उपवास करावा. चांगले कर्म करावे. वाईट, चुकीचे कर्म करू नये. हे व्रत दुसर्‍या दिवशी द्वादशीच्या तिथीला सोडावे. उपवास सोडण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा करावी.

Credit: Times Network

एकादशीचे व्रत

सकाळी नित्यकर्म आटोपून घ्या. आंघोळ करा. यानंतर व्रतासाठी तयारी सुरू करा. भगवान विष्णू यांचे नामस्मरण करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनापासून पूजा करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. मांसाहार टाळा. धूम्रपान टाळा. मद्यपान टाळा. खोटे बोलू नका. फसवणूक करू नका. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांचे दान करा.

Credit: Times Network

कधी आहे चैत्र नवरात्र?

पापमोचनी एकादशी शनिवार 18 मार्च 2023 रोजी आहे तर चैत्र नवरात्र या उत्सवाचा आरंभ बुधवार 22 मार्च 2023 रोजी होणार आहे.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे उद्याचे राशीभविष्य येथे पहा

अशा आणखी स्टोरीज पाहा