Mar 14, 2023
पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही.
Credit: cavana
लवासा सिटी हे पुण्यातील एक नियोजित, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून काहीश्या अंतरावर असलेल्या लवासा सिटीची ख्याती जगभरात पसरलेली आहे.
Credit: cavana
शनिवार वाडा ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो.
Credit: cavana
गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंगासाठी करण्यात आला होता.
Credit: cavana
अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं. मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात.
Credit: cavana
पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.
Credit: cavana
पुण्यापासून जवळ असलेल्या आळंदी गावादेखील तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. देवाची आळंदी या नावाने आळंदी गावाची ख्याती आहे.
Credit: cavana
पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरव्या गार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे.
Credit: cavana
कात्रजमधील राजीव गांधी सर्पोद्यान जवळजवळ 130 किमीवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणीसंग्रहालय आहे.
Credit: cavana
विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव विश्रामबागेत राहणं पसंत करत असत.
Credit: cavana
पुण्यात घोळे रोडवर शिवाजी नगर येथे महात्मा फुले संग्रहालय आहे. महात्मा फुलेंचे हे निवासस्थान होते. या संग्रहालयात शेती, शेतीची साधने, हस्तकला, दागदागिने, कोरिव काम, पुतळे अशा जुन्या वस्तूंचे जतन केलेले आहे.
Credit: cavana
Thanks For Reading!