Apr 4, 2023

BY: Times Now Digital

​रात्री इनरवेअर घालून झोपावे की नाही?​

​रात्रीच्या सुमारास इनरवेअर घालून झोपावे की नाही?

आपल्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्न असतात की, रात्रीच्या सुमारास इनरवेअर घालून झोपावे की नाही? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का?

Credit: pexels

​इनरवेअर का घालू नये?

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच खाजगी भागांना सुद्धा विश्रांतीची आवश्यकता असते. इनरवेअर घालून झोपल्याने त्वचेला मोकळेपणाने श्वास घेता येत नाही. त्यामुळे रात्री इनरवेअर काढून झोपण्याचा सल्ला देण्यात येतो.

Credit: pexels-pixabay

​रिसर्च काय सांगतो?​

अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात महिलांनी इनरवेअरशिवाय झोपण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे झोपल्याने योनी मार्गातील संसर्ग आणि इतर लैंगिक संक्रमणाच्या आजारांपासून संरक्षण होते.

Credit: pexels

​स्मर्म क्वॉलिटी वाढते

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते, इनरवेअरशिवाय झोपणाऱ्या पुरुषांच्या स्पर्मची संख्या वाढते. तसेच गुणवत्ता सुद्धा अधिक चांगली होते. तर इनरवएअर परिधान करुन झोपल्याने स्पर्म काऊंटवर निगेटिव्ह परिणाम होतो.

Credit: pexels

​पीएच लेवल​

रात्रीच्या सुमारास योनीची पीएच पातळी योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. असे यासाठी आहे कारण, यामुळे बुरशी होण्याचा धोका अधिक असतो. अशा स्थितीत तुम्ही इनरवेअर घालून झोपत नसाल तर तुमची पीएच पातळी योग्य राहते.

Credit: pexels

​संसर्गाचा धोका कमी

रात्री इनरवेअर शिवाय झोपल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. कारण दिवसभर प्रायव्हेट पार्ट्समधून द्रवपदार्थ बाहेर पडत राहतो आणि तो इनरवेअरवर राहतो.

Credit: pexels

​अस्वस्थ वाटणे

इनरवेअर शिवाय झोपणे म्हणजे नग्न झोपणे असे नाहीये. तुम्हाला हवे असेल तर सैल पायजमा, शॉर्ट्स किंवा लुंगी परिधान करु शकता.

Credit: pexels

You may also like

लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा प...
राशीभविष्य 5 एप्रिल : या राशीच्या व्यक्त...

कॉटन इनरवेअर​

जर तुम्हाला बॅक्टेरियल संसर्ग टाळायचा असेल तर तुमचे इनरवेअर हे कॉटनच्या कपड्यांचे खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण, हे कपडे द्रवपदार्थ लवकर शोषून घेते.

Credit: pexels

दुसऱ्या दिवशी तेच कपडे नको

एकदा परिधान केलेले इनरवेअर कधीही दुसऱ्या दिवशी सुद्धा परिधान करु नका. दररोज अदलून-बदलून इनरवेअर वापरत जा.

Credit: pexels

​चुकीचे डिटर्जंट

इनरवेअर स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट सुद्धा महत्त्वाचे आहे. सुगंधित वॉशिंग पावडरमुळे खाज येण्याची समस्या उद्भवू शकते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं

अशा आणखी स्टोरीज पाहा