या टिप्सने पत्नीचा राग होईल बर्फासारखा थंड

Sunil Desale

Aug 5, 2022

जेव्हा बायकोला राग येतो

नात्यात एक वेळ अशी येते की बायकोला राग येतो. अशा परिस्थितीत त्यांचा राग शांत करुन त्यांचं मन कसं वळवायचं हे महत्त्वाचं आहे. पत्नीचा राग शांत करण्यासाठी काही टिप्स आहेत.

Credit: pexels

​असे करू नका

वाद सुरू असेल किंवा मन वळवण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. पत्नीच्या रागात भर पडेल असे काहीही बोलू नका.

Credit: istock

​झोपण्यापूर्वी नक्की चर्चा करा

जर तुमचं पत्नीसोबत दिवसा भांडण झाले आणि रात्रीपर्यंत पत्नीचा मूड खराबच असेल तर झोपण्यापूर्वी पत्नीसोबत बोला. असे केल्याने पत्नीचा राग शांत होण्यास मदत होईल.

Credit: istock

​सकाळचा चहा

पत्नी रागात असेल तर तिला सकाळचा चहा आणि नाश्ता करुन सरप्राईज द्या. यामुळे तिचा मूड नक्कीच बदलेल.

Credit: istock

​आवडती थाळी

तसेच तुमच्या पत्नीची आवडती डीश बनवून सुद्धा तुम्ही त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करू शकता.

Credit: istock

​बाहेर फिरायला जाणे

बायकोला बाहेर फिरायला घेऊन जा. वातावरण बदलले तर त्यांचा राग शांत होण्यास मदत होईल.

Credit: istock

​फुलांचा गुच्छ

एक पुष्पगुच्छ देऊन सॉरीचं लेटर किंवा कार्ड त्यावर चिकटवा. यामुळे पत्नीचा राग शांत होईल.

Credit: pexels

​गिफ्ट

फुलांऐवजी तुम्ही पत्नीला एखादे छान गिफ्ट देऊन तिचा राग शांत करू शकता.

Credit: pexels

लेटर

एखादे छोटेसे लेटर किंवा पत्र लिहा ज्यामध्ये तुमच्या भावना लिहा. हे वाचून पत्नीचा राग नक्कीच कमी होईल.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पार्टनरला आकर्षित करण्यासाठी करा हे काम