Nov 16, 2022

BY: Times Now Digital

या 6 टिप्सने तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्यास राहाल नेहमीच उत्सुक

​शारीरिक संबंध

लग्नानंतर सुरुवातीच्या काळात पती-पत्नीला एकमेकांबाबत आकर्षण असणे हे स्वाभाविक आहे. मात्र, नंतर अनेकांचा शारीरिक संबंधांच्या बाबतचा रस कमी होऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी स्पार्क निर्माण करणाऱ्या काही टिप्स...

Credit: Canva

​एकावेळी एकालाच प्राधान्य

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा तरी जोडप्याने एकांतात रात्र घालवणे गरजेचे आहे. लहान मुले असतील तर त्यांना वडिलधाऱ्यांसोबत झोपायला पाठवा. रात्रभर बाहेर जा. मुक्तपणाचा अनुभव घ्या.

Credit: Canva

​क्वॉलिटीवर लक्ष

आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवता हे महत्त्वाचे नाही. तर पार्टनरसोबत तुमचे सेक्युअल रिलेशन कसे आहेत हे महत्त्वाचे आहे.

Credit: Canva

​दबाव काढून टाका आणि हवे ते करा

लग्नानंतर काही काळाने बाळ होते. बाळ मोठे झाल्यावर लैंगिक संबंध ठेवावेत की नाही? असा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, ही एक शारीरिक गरज आहे आणि वेळोवेळी ती पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावर असलेला दबाव काढून टाका आणि हवे ते करा.

Credit: Canva

​ड्रेस अप

लैंगिक संबंध आणखी मजेशीर करण्यासाठी तुम्ही नाईट ड्रेस विविध प्रकारचे खरेदी करु शकता. मुलं झोपल्यावर ते ड्रेस परिधान करुन तुम्ही वेगळा आनंद घेऊ शकता.

Credit: Canva

​सर्व गोष्टीबद्दल बोलू नका

आपल्या पार्टनरच्या सर्व गोष्टी, इच्छा, विचार आणि सीक्रेट्स हे जाणून घेण्याची गरज नाही.

Credit: Canva

गैरसमज

अनेक जोडप्यांचा गैरसमज असतो की, बाळ झाल्यावर शारीरिक संबंध ठेवू नये किंवा त्यात त्यांना रस नसतो. मात्र, तसे काहीही नाहीये.

Credit: Canva

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जेवणाच्या ताटात 3 चपात्या का देऊ नये?

अशा आणखी स्टोरीज पाहा