Priyanka Deshmukh
Jun 1, 2023
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमाला खूप महत्त्व आहे, या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पती आणि वैवाहिक जीवनासाठी सुख-समृद्धीची कामना करतात.
Credit: Facebook
यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात, कथा ऐकतात किंवा उपवास करतात.
Credit: Facebook
तुम्हीही वट सावित्री व्रत करत असाल आणि वटपूजेसाठी सुंदर दिसायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला स्पेशल महाराष्ट्रियन लूकबद्दल सांगणार आहोत.
Credit: Facebook
वट सावित्री व्रताच्या दिवशी तुम्हाला स्पेशल लुक कॅरी करायचा असेल तर तुम्ही क्रिती सॅननचा गोल्डन शिमरी साडी लूक कॅरी करू शकता. या प्रकारच्या साडीत तुम्ही सुंदर दिसाल. या चमकदार साडीसोबत तुम्हाला तुमच्या मेकअपची विशेष काळजी घ्यावी लागेल.
Credit: Facebook
कांजीवरम साडी तुम्हाला अतिशय क्लासी लुक देते आणि वट सावित्रीच्या दिवशी तुमचा लूक सर्वात खास बनवते. या प्रकारची साडी नेसून तुम्ही त्यावर टेंपल ज्वेलरी ट्राय करू शकता.
Credit: Facebook
वट सावित्री व्रताच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसून तुम्ही हा खास दिवस आणखी खास बनवू शकता. लाल रेशमी साडीवर तुम्ही केसांचा आंबाडा टाकून त्यावर गजरा लावू शकता. आणि नाकात सिंपल नथ घालून सुंदर दिसू शकता.
Credit: Facebook
रुपाली भोसले हिने आपल्या उत्कृष्ट फॅशन सेन्स आणि अभिनयाच्या पराक्रमाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. रुपालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे जी तिने मॅचिंग बांगड्या, अँटीक नेकपीस, नथ आणि हलक्या वजनाच्या सोन्याच्या कानातल्यासह कॅरी केली आहे.
Credit: Facebook
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये उत्कृष्ट कामासाठी ओळखली जाणारी तरुण आणि सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी ही खरी फॅशनिस्टा आहे. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर निळ्या आणि लाल रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत तुम्ही सुद्धा प्राजक्ताचा हा लूक वटपोर्णीमेला कॉपी करू शकता.
Credit: Facebook
तुम्हाला 'मराठी मुलगी ' लूक करायचा असेल तर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा लूक कॉपी करा. तिने पिवळ्या रंगाची पारंपारिक नऊवारी शैलीत रेशमी साडी नेसली आहे. त्यावर लाल दुपट्टा कॅरी केला आहे. त्यावर हिरव्या काचेच्या बांगड्या, स्टेटमेंट गोल्ड चोकर, मॅचिंग कानातले, पारंपारिक नथ , कमरबंध आणि चंद्रकोराच्या आकाराची टिकली लावून लूक पूर्ण केला आहे.
Credit: Facebook
आपण पारंपरिक मराठी नऊवारी साडीत खूप सुंदर दिसू शकता त्यासाठी 'बॉलिवुडची धक धक गर्ल', माधुरी दीक्षितचा हा लूक बघा. तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुंदर चमकदार ग्रीन आणि केसरी साडी असेल तर ती या स्टाईलने कॅरी करा. त्यावर पेशवाई नथ आणि पारंपारिक साज घालून लूक पूर्ण करा.
Credit: Facebook
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद