आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक कसं करायचं? वाचा

Sunil Desale

Aug 5, 2022

​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

निवडणुकीच्या वेळी देशात बोगस वोटिंगची अनेक प्रकरणे समोर येतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेत आधार आणि वोटर आयडी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Credit: BCCL

​मतदान ओळखपत्र - आधार कार्ड लिंकिंग

आधार कार्ड केवळ पॅनकार्डसोबतच नाही तर Voter ID सोबत लिंक करा. त्यामुळे बोगस वोटिंगची प्रकरणे कमी होतील.

Credit: iStock

​आधार-पॅन लिंकिंग कसे करावे?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP)च्या (nvsp.in) या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

Credit: iStock

​लॉग इन करा

त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा आणि होम पेजवर 'मतदार यादीमध्ये शोधा' हा पर्याय निवडा.

Credit: BCCL

​माहिती अ‍ॅड करा

मतदार ओळखपत्र शोधण्यासाठी वैयक्तिक माहिती किंवा निवडणूक फोटो आयडी म्हणजेच EPIC नंबर आणि राज्य या संदर्भातील माहिती अ‍ॅड करा.

Credit: iStock

​आधार नंबर अ‍ॅड करा

यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुमचा Aadhaar Card नंबर लिहा असं म्हटलं असेल. त्यावर क्लिक करा.

Credit: BCCL

​इतर माहिती

त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची माहिती अ‍ॅड करण्यास सांगितले जाईल.

Credit: BCCL

​ओटीपी अ‍ॅड करा

आधारची माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेलवर एक OTP मिळेल. तो सबमिट करा.

Credit: iStock

​काय होईल फायदा?

या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मतदार यादीतील डुप्लिकेट नोंद आढळून येईल आणि ते बाद करता येईल.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आधारशी संबंधित तक्रार करण्याचे ४ पर्याय