Aug 26, 2022

तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....

Sunil Desale

​UPI पेमेंट झाले सोपे

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या एन्ट्रीने पेमेंट करण्याची सिस्टम खूप सोपी झाली आहे. ऑनलाईन पेमेंटमुळे आता मोठ-मोठे पेमेंट्स अवघ्या काही क्षणांत पूर्ण होतात.

iStock

​हे आहेत लोकप्रिय Apps

UPI पेमेंटसाठी Google Pay, PhonePe आणि Paytm हे खूपच लोकप्रिय Apps आहेत.

iStock

​सायबर गुन्ह्यांत वाढ

एकीकडे UPI पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले आहेत. पण त्याचवेळी सायबर गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

iStock

​काळजी घ्या

अशा परिस्थितीत तुमच्या अकाऊंटमधून पैसे गायब होऊ नयेत यासाठी काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

iStock

​PIN नंबर शेअर करू नका

ऑनलाईन पेमेंटसाठी आवश्यक असलेला तुमचा 6 अंकी किंवा 4 अंकी PIN नंबर कुणासोबतही शेअर करू नका.

iStock

​फोन स्क्रिनवर नेहमी लॉक

UPI Apps च्या सुरक्षेसाठी फोनची स्क्रिन नेहमी लॉक ठेवत जा. अशा परिस्थितीत तुमच्या फोनवर स्क्रिन लॉक नक्कीच ठेवा. फिंगरप्रिंट लॉक नेहमी चांगला कारण कधीकधी पिन नंबर सुद्धा अनलॉक केला जाऊ शकतो.

iStock

​व्यवहार करण्यापूर्वी UPI ID तपासा

UPI पेमेंट सिस्टममध्ये प्रत्येकाचा एक युनिक आयडी असतो. याच्याच आधारे तुम्ही एकमेकांना पेमेंट करू शकता. तुम्ही कुणाला ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्यावेळी UPI आयडी क्रॉस चेक करा आणि तपासून पाहा. त्यानंतरच पेमेंट करा.

iStock

You may also like

विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या...
या टिप्सने तुमची मुले गणितात होतील हुशार

​जास्त प्रमाणात UPI Apps टाळा

जास्त प्रमाणात Apps वापरल्याने गोंधळ वाढू शकतो आणि पेमेंटमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत जास्त UPI Apps वापरणे टाळा.

iStock

​संशयास्पद लिंकवर क्लिक नको

आजकाल WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या लिंक्स पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक करुन UPI पेमेंट करायला सांगितले जाते. तशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका. अशा प्रकारची लिंक आल्यास ती ताबडतोब डिलिट करा किंवा ब्लॉक करा.

iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...

अशा आणखी स्टोरीज पाहा