Mar 27, 2023

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी करा हे उपाय

Rohan Juvekar

अर्ध्य

परीक्षेला जाण्याआधी सकाळी आंघोळ करून पूर्व दिशेला सूर्याला अर्ध्य द्या

Credit: Times Network

देवी सरस्वती

ज्या ठिकाणी बसून अभ्यास करता त्या ठिकाणी सहज दिसेल अशा प्रकारे सरस्वती देवीचा फोटो लावा. दररोज अभ्यास सुरू करण्याआधी देवीला मनापासून नमस्कार करा आणि देवीची पूजा करा. नंतर व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षा द्या.

Credit: Times Network

गणपतीला दुर्वा वाहा

परीक्षेला जाण्याआधी सकाळी गणपतीचे दर्शन घ्या आणि बाप्पाला दुर्वा वाहा. गणपतीला मनापासून नमस्कार करा आणि गणपती बाप्पाची पूजा करा. दर बुधवारी गणपती दुर्वा आणि लाडू अथवा दुर्वा आणि मोदक अर्पण करा.

Credit: Times Network

गायीला चारा

परीक्षेला जाण्याआधी दररोज सकाळी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. गायीला नमस्कार करा. गायीला पाणी पाजा. हे दररोज शक्य नसल्यास किमान दर बुधवारी करा.

Credit: Times Network

मोरपीस

अभ्यासाच्या पुस्तकात मोरपीस ठेवा

Credit: Times Network

दही

परीक्षेला जाण्याआधी देवाला तसेच घरातील मोठ्यांना नमस्कार करा. हातावर एक चमचा दही घेऊन ते खा. नंतर परीक्षेसाठी निघा. शक्यतो एक चमचा गोड दही खा.

Credit: Times Network

गणपती स्तोत्र

परीक्षेला जाण्याआधी दररोज सकाळी गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणेश चालीसा हे म्हणा. किमान या तीन पैकी ​एक मनापासून म्हणा आणि देवाला नमस्कार करून नंतर परीक्षेसाठी निघा.

Credit: Times Network

You may also like

अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा
ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर X का लिहिले...

अभ्यास

परीक्षेला जाण्याआधी अभ्यास करणे, पूर्वतयारी करणे अत्यावश्यक आणि महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. अभ्यास केल्यानंतर इच्छा असेल आणि विश्वास असेल तर परीक्षेला जाण्याआधी ज्योतिषांनी सुचवलेले उपाय करू शकता.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा

अशा आणखी स्टोरीज पाहा