म्हणून तुम्ही हम्पीला भेट दिलीच पाहिजे

Tushar Ovhal

May 14, 2022

कुठे आहे हम्पी

कर्नाटकाच्या बेल्लारी जिल्ह्यात हम्पी हे पर्यटनस्थळ आहे. हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. या ठिकाणातील अनेक मंदिरांचे अवशेष आजही उत्तम स्थितीत आहेत.

Credit: Shutterstock

समृद्ध इतिहास

हम्पीचा इतिहास समृद्ध असून १९८६ साली या स्थळाला युनेक्सोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. ७ व्या शतकात बनलेल्या शहरात हिंदू विरुपक्षा मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथ हे जगप्रसिद्ध आहेत.

Credit: Shutterstock

हेमकुटा हिल टेम्पल

हे एक प्राचीन मंदिर असून आता या मंदिराचे फक्त अवशेष उरले आहेत.

Credit: Shutterstock

विट्टाला मंदिर

हम्पीतील हे मंदिर दगडांतून साकरण्यत आले आहे. या दगडांवर हात मारल्यास सुंदर आवाज येतात.

Credit: Shutterstock

विरुपाक्ष मंदिर

स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणजे हम्पीतील विरुपाक्ष मंदिर. ७ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले होते.

Credit: Shutterstock

मथंग मंदिर

हे मंदीर एका डोंगरात वसले असून या मंदिरात जाण्यासाठी खूप सार्‍या पायर्‍या चढून जावं लागतं.

Credit: Shutterstock

सिस्टर स्टोन्स

हम्पीतील त्रिकोणी आकारात असलेल्या या दगडांची एक कथा आहे. दोन बहीणी या ठिकाणी आल्या आणि त्यांनी इथल्या मंदिराची निंदा केली, तेव्हा देवीने त्यांन शाप दिला आणि त्यांचे रुपांतर या दगडांत झाले अशी अख्यायिका आहे.

Credit: Shutterstock

रामायणात उल्लेख

रामायणातही हम्पीचा उल्लेख आहे. रामायणात हम्पी ही वानर राज्य किष्किन्धाची राजधानी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Credit: Shutterstock

पप्मा सरोवर

हिंदू धर्मशास्त्रात पंच सरोवराचा उल्लेख आहे, त्यात पम्पा सरोवराचा समावेश आहे.

Credit: Shutterstock

जाण्याचे अनेक मार्ग

हवाई मर्गाने हुबळी तर रेल्वे मार्गाने हॉस्पेट हे स्थानक जवळ आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ हम्पीला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.

Credit: Shutterstock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दिल्लीत या स्थळांना द्या आवर्जून भेट