Feb 21, 2023

घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

Rohan Juvekar

वेबसाईट

​https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या सरकारी वेबसाईटवर जा, आपले राज्य निवडा. नंतर अप्लाय फॉर लर्नर लायसन्स हा पर्याय निवडा.

Credit: Times Network

मोबाईल किंवा पीसी वा लॅपटॉप

मोबाईल किंवा पीसी वा लॅपटॉपवरून वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करता येईल.

Credit: Times Network

आधार कार्ड

लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करताना स्वतःचा आधार नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा. परीक्षा घरून देणार की जवळच्या आरटीओ केंद्रावरून हा पर्याय पण निवडता येईल.

Credit: Times Network

आधार आणि मोबाईल

आधार नंबर आणि मोबाईल नंबर नोंदवून सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत नमूद करा आणि सबमिट करा. नियम व अटी वाचा आणि मान्य असल्याचे नमूद करण्यासाठी टिकवर क्लिक करा. नंतर लायसन्स पेमेंट मोडवर क्लिक करा आणि योग्य तो पर्याय निवडून पेमेंट करा.

Credit: Times Network

ऑनलाईन परीक्षा

सरकारी फॉर्म भरून सबमिट करा नंतर ऑनलाईन परीक्षा द्या. परीक्षा सुरू असताना आपला आपला वेबकॅम सुरू करा आणि त्याचा फोकस आपल्या चेहऱ्यावर ठेवा

Credit: Times Network

टेस्ट

टेस्टमध्ये फेल झाल्यास 50 रुपये भरून पुन्हा टेस्ट देऊ शकता. टेस्ट पास झालात तर PDF स्वरुपात लगेच लर्नर लायसन्स मिळेल.

Credit: Times Network

लायसन्सची सॉफ्ट कॉपी

लायसन्सची सॉफ्ट कॉपी आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता किंवा लर्नर लायसन्सची प्रिंटआऊट घेऊन ती स्वतःसोबत बाळगू शकता.

Credit: Times Network

कार चालवू शकता

लर्नर लायसन्स मिळाल्यावर त्याची मुदत संपेपर्यंत कार चालवू शकता. या लायसन्सची मुदत संपण्याच्या आत पर्मनंट लायसन्स काढून घेण्याची प्रक्रिया करणे हिताचे. पर्मनंट लायसन्स काढण्याआधी ड्रायव्हिंग व्यवस्थित शिकून घ्या.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारतात उन्हाळी सुट्टीत फिरण्याची ठिकाणं

अशा आणखी स्टोरीज पाहा