स्वातंत्र्यापूर्वी असे असत AC कोच

Amol Joshi

Sep 21, 2022

​लोकांना असं केलं जायचं गारेगार

भारतीय रेल्वे हे जगातील चौथं मोठं नेटवर्क मानलं जातं. गेल्या काही दशकांत रेल्वेत बऱ्याच सुधारणा झाल्या. मात्र पहिली रेल्वे कशी होती आणि त्यात एसीची सुविधा कशी करण्यात आली, ते समजून घेऊया.

Credit: Social-Media

​पहिली एसी ट्रेन

देशातील पहिल्या एसी ट्रेनचं नाव होतं फ्रंटियर मेल. सुमारे 94 वर्षांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 1928 ला ही ट्रेन पहिल्यांदा धावली.

Credit: Social-Media

​1934 साली नामांतर

अगोदर ही ट्रेन पंजाब एक्सप्रेस या नावाने ओळखली जात असे. त्यानंतर 1934 साली त्याला नवा एसी डबा जोडला गेला आणि त्याचं नाव बदललं गेलं.

Credit: Social-Media

​हे होते तंत्रज्ञान

फ्रंटियर मेलचा डबा थंड ठेवण्यासाठी एका खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे.—-----------

Credit: Social-Media

​बर्फाच्या लाद्यांचा उपयोग

बोगी थंड करण्यासाठी बर्फाच्या लाद्यांचा वापर केला जाई. या लाद्या बोगीच्या खाली ठेवल्या जात आणि पंख्याचा वापर करून त्याची थंड हवा प्रवाशांना देिली जात असे.

Credit: Social-Media

​सुगंधाचा वापर

ट्रेनच्या खिडक्यांपाशी सुगंधी द्रव्ये ठेवली जात. वाऱ्यामुळे बोगीभर सुगंध दरवळत असे.

Credit: Social-Media

​पेशावरपर्यंत ट्रेन

ही रेल्वे मुंबईपासून अफगाणिस्तानच्या सीमेपाशी असणाऱ्या पेशावरपर्यंत धावत असे. या ट्रेनमधून इंग्रज अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकही प्रवास करत असत.

Credit: Social-Media

​बर्फाची अशी व्हायची सोय

रेल्वेत बर्फाची सोय होण्यासाठी इंग्रजांनी काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनजवळ बर्फघरं उभी केली होती.

Credit: Social-Media

​1996 साली पुन्हा नामांतर

स्वातंत्र्यानंतर ही रेल्वे मुंबई ते अमृतसर अशी धावू लागली. तिचं नाव बदलून ‘गोल्डन टेम्पल मेल’ असं करण्यात आलं

Credit: Social-Media

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे