Feb 21, 2023

BY: Times Now Digital

भारतातील या नदीचं कुणीही पित नाही पाणी, काय आहे कारण?

भारतात नद्यांचं महत्त्व

भारतात नद्यांना मातेचा दर्जा दिला गेला आहे आणि त्यासोबतच त्यांना धार्मिक महत्त्वही खूप आहे.

Credit: Social-Media

नद्या केवळ जीवनदायी नाहीत

भारतात नद्यांना केवळ जीवनदायी असे मानले जात नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्व सुद्धा भारतीय समाजात अधिक आहे.

Credit: Social-Media

भारतातील एक नदी

भारतात एक अशी नदी आहे ज्याचं पाणी पिणं तर दूर पण त्या पाण्याला स्पर्श करणं सुद्धा लोकं टाळतात.

Credit: Social-Media

नदीचं नाव काय?

उत्तरप्रदेशातील या नदीचं नाव आहे कर्मनाशा. या नदीच्या पाण्याला कुणीही स्पर्श करत नाही आणि पित सुद्धा नाही.

Credit: Social-Media

या राज्यांतून वाहते नदी

कर्मनाशा नदी ही बिहार आणि उत्तरप्रदेशातून वाहते. या नदीचा बहुतांश भाग हा उत्तरप्रदेशात आहे. येथील सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपूर येथून ही नदी बक्सर जवळ गंगा नदीत मिळते.

Credit: Social-Media

या नदीच्या पाण्याला स्पर्श केल्यास...

कर्मनाशा दोन शब्दांनी बनली आहे ज्यापैकी पहिला शब्द कर्म आणि दुसरा नाशा आहे. असे मानले जाते की, कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्यास होणारे काम बिघडते आणि चांगले कर्मही वाया जाते.

Credit: Social-Media

नदीच्या पाण्याला स्पर्श

असे म्हणतात की, कर्मनाशा नदीच्या संदर्भातील मान्यता यामुळे तेथील लोक नदीतील पाण्याला स्पर्शही करत नाही आणि कोणत्याही कामासाठी त्या पाण्याचा वापर करत नाही.

Credit: Social-Media

अपवित्र

कर्मनाशा नदी ही उत्तरप्रदेशातील वाराणसी, सोनभद्र, चंदौली आणि बिहार येथील आरा, बक्सरमधून वाहते. या नदीला अनेकजण अपवित्र मानतात.

Credit: Social-Media

फळे खाणार पण...

असे म्हटले जाते की, तहान लागलेली असतानाही येथील लोक नदीचं पाणी पिण्याऐवजी फळे खाऊन तहान भागवण्याचा प्रयत्न करत होते पण नदीचं पाणी वापरत नव्हते.

Credit: Social-Media

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

अशा आणखी स्टोरीज पाहा