पीएम मोदींकडे किती पैसे आहेत, येथून होते कमाई

Prashant Jadhav

May 24, 2022

​नरेंद्र मोदींचे उत्पन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्पन्न किती आहे, त्यांच्या बँक खात्यात किती पैसे जमा आहेत हे जाणून घेण्याची क्रेझ प्रत्येकाला असते.

Credit: bccl

​नरेंद्र मोदींची निव्वळ संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबद्दल जवळपास सर्वांनाच रस आहे. त्याच्याशी संबंधित प्रत्येक तपशील आम्ही तुम्हांला या ठिकाणी सांगत आहोत.

Credit: bccl

​मोदींकडे किती संपत्ती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 2,51,36,119 रुपयांची आहे.

Credit: bccl

​पीएम मोदींचा बँक बॅलन्स

मोदी सरकार बँकिंग क्षेत्राला सतत प्रोत्साहन देत आहे. पीएम मोदींकडे 38,750 रुपये रोख आणि 1,27,85,717 रुपये बँक बँलेन्स आहे.

Credit: bccl

​पीएम मोदींची संपत्ती

याशिवाय नरेंद्र मोदींकडे 20,000 रुपयांचे रोखे, डिबेंचर्स आणि कंपन्यांचे शेअर्स आहेत.

Credit: bccl

पंतप्रधानांचा विमा

विमा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. देशाच्या पंतप्रधानांकडे 1,90,347 रुपयांची LIC किंवा इतर विमा पॉलिसी आहेत.

Credit: bccl

​मोदींकडे किती सोने आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1,13,800 रुपये आहे.

Credit: bccl

​नरेंद्र मोदींचे किती घरं आहेत?

नरेंद्र मोदींच्या घराबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे 1 कोटीहून अधिक म्हणजे 1,10,00,000 रुपयांची निवासी मालमत्ता आहे.

Credit: bccl

​मोदी कसे कमावतात?

पंतप्रधानांना भारत सरकारकडून पगाराचे उत्पन्न मिळते. याशिवाय त्यांना बँकेकडून व्याज मिळते. स्रोत - 2019, ADR अहवाल

Credit: bccl

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: काळा ताजमहल खरंच अस्तित्वात आहे का ?