Feb 15, 2023

कधी आहे महाशिवरात्र 2023, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

Rohan Juvekar

महाशिवरात्र

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र म्हणतात. तसेच प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र म्हणतात. यंदा शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्र आहे. याच दिवशी प्रदोष व्रत आहे.

Credit: Times Network

महाशिवरात्रीची पूजा

महाशिवरात्रीला शंकराची पूजा करतात. शिवलिंग पूजेला विशेष महत्त्व आहे.

Credit: Times Network

महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त

महाशिवरात्री निमित्त रात्री शंकराची पूजा करतात अथवा रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये मिळून 4 वेळा पूजा करतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. भाविक उपवास करतात.

Credit: Times Network

महाशिवरात्रीची पहिली पूजा

महाशिवरात्रीची पहिली शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 6.18 ते रात्री 9.31 या वेळेत होईल.

Credit: Times Network

महाशिवरात्रीची दुसरी पूजा

महाशिवरात्रीची दुसरी पूजा शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9.31 ते रात्री 12.44 या वेळेत होईल.

Credit: Times Network

महाशिवरात्रीची तिसरी पूजा

महाशिवरात्रीची तिसरी पूजा शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.44 ते मध्यरात्री 3.57 या वेळेत होईल.

Credit: Times Network

महाशिवरात्रीची चौथी पूजा

महाशिवरात्रीची चौथी पूजा शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 3.57 ते सकाळी 7.10 या वेळेत होईल.

Credit: Times Network

महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12.18 ते 1.10 असा 51 मिनिटांचा आहे.

Credit: Times Network

महाशिवरात्र कधी पर्यंत आहे?

महाशिवरात्र शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 08.02 ते रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 4.18 पर्यंत आहे.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: स्पर्म डोनेट करा अन् 82 हजार रुपये मिळवा

अशा आणखी स्टोरीज पाहा