Mar 17, 2023

BY: Times Now Digital

​अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा​

​IRCTC टूर​

तुम्ही राज्याचा दौरा करण्याचं प्लानिंग करत असाल तर आयआरसीटीसीने तुमच्यासाठी चांगलं टूर पॅकेज उपलब्ध करुन दिलं आहे.

Credit: pexels

​मॅजेस्टिक महाराष्ट्र पॅकेज​

या पॅकेजचं नाव मॅजेस्टिक महाराष्ट्र आहे. तीन रात्र आणि चार दिवसांचं हे पॅकेज आहे. यामध्ये औरंगाबाद, एलोरा, शिर्डी आणि नाशिक ही ठिकाणे फिरता येतील.

Credit: instagram/saidarshanshirdi

6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यत टूर

ही टूर 6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत असणार आहे. आयआरसीटीसी 6 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी हैदराबाद एअरपोर्टवरुन फ्लाईट 6E 6062 ने पर्यटकांना शिर्डीला घेऊन जाईल.

Credit: pexels

​9 एप्रिलपर्यंत टूर​

9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी औरंगाबाद एअरपोर्टवरुन 6E 7157 ने पुन्हा पर्यटकांना हैदराबाद येथे सोडण्यात येईल.

Credit: pexels

​ही असेल व्यवस्था

टूर दरम्यान वास्तव्यासाठी हॉटेल आणि 3 ब्रेकफास्ट, 2 डिनरची सुविधा मिळणार आहे. तर स्थानिक ठिकाणी फिरण्यासाठी एसी बस उपलब्ध असेल.

Credit: pexels

​इतके असेल पॅकेज

कन्फर्ट क्लासमध्ये एका व्यक्तीसाठी 25,800 रुपये, डबलसाठी 21,400 प्रति व्यक्ती आणि ट्रिपलसाठी 20,900 रुपये चार्ज करण्यात येतील.

Credit: pexels

​लहान मुलांसाठी तिकीट किती?​

बेडसह 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 19500 रुपये तर बेडशिवाय 15,800 रुपये आणि दोन ते चार वर्षांच्या मुलासाठी बेडशिवाय 14750 रुपये इतके तिकीट असणार आहे.

Credit: pexels

​असं करा बुकिंग

याचं बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

Credit: pexels

​ट्विटरवरुन माहिती

IRCTC ने ट्विटरवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारतात महिलांसाठी सोलो ट्रीपची 5 ठिकाणे

अशा आणखी स्टोरीज पाहा