या गावात महिला-पुरुष कोणीही कपडे परिधान करत नाही

Sunil Desale

Nov 21, 2022

​विचित्र परंपरा

जगभरातील विविध भागांत वेगवेगळ्या आणि अजब-गजब अशा प्रथा, परंपरा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाच्या संदर्भात सांगणार आहोत जेथील परंपरा ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Credit: Social-Media

​पैसे असतानाही कपडे परिधान करत नाही

या जगात असं एक गाव आहे जेथे ग्रामस्थांकडे पैसे असतानाही ते कपडे परिधान करत नाहीत.

Credit: Social-Media

​90 वर्षांपासून परंपरा सुरू

ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर येथील या गावाचं नाव स्पीलप्लाट्ज आहे. जवळपास 90 वर्षांपासून या गावातील लोक हे कपड्यांशिवाय राहतात.

Credit: Social-Media

​सर्व ग्रामस्थ नियमांचे पालन करतात

स्पीलप्लाट्ज गावातील ग्रामस्थ हे सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे धन-संपत्ती सुद्धा आहे. मात्र, असे असतानाही गावातील लहान मुले, वयोवृद्ध, महिला-पुरुष सर्वच कपडे परिधान करत नाहीत.

Credit: Social-Media

​ग्रामस्थांची परंपरा

आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे विना कपड्यांचे राहणे कुणालाही विचित्र वाटत नाही. येथील ग्रामस्थ खूपच सहजपणे विनाकपड्यांचे वावरतात आणि परंपरेचे पालन करतात.

Credit: Social-Media

​इसुल्ट रिचर्डसन यांनी शोधलं होतं गाव

असं म्हटलं जातं की, या गावाचा शोध 1929 मध्ये इसुल्ट रिचर्डसन यांनी लावला होता. जेव्हा या गावाचा शोध लावला तेव्हा निर्णय घेतला की, या गावातच आपलं आयुष्य घालवायचं.

Credit: Social-Media

​गावात विविध सुविधा

या गावात पब, स्विमिंग पूल, क्लबची सुद्धा व्यवस्था आहे. इतकेच नाही तर हे गाव पाहण्यासाठी जे लोक येतात त्यांनाही या गावातील नियमांचे पालन करावे लागते.

Credit: Social-Media

​कधी-कधी कपडे परिधान करतात ग्रामस्थ

या गावातील ग्रामस्थ जेव्हा गावाबाहेर जातात तेव्हा ते कपडे परिधान करतात. याच्याव्यतिरिक्त थंडी पडते तेव्हा सुद्धा ते कपडे परिधान करतात.

Credit: Social-Media

​अनेक संघटनांनी या परंपरेला केला विरोध

अनेक संघटनांनी या परंपरेला विरोध दर्शवला आहे. मात्र, काही फायदा झाला नाही, आजही या गावातील ग्रामस्थ ही परंपरा कायम ठेवत आहेत.

Credit: Social-Media

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: इतक्या महागड्या शाळा-कॉलेजमध्ये शिकलेत अंबानी-अदानींची मुले

अशा आणखी स्टोरीज पाहा