पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन

Tushar Ovhal

May 13, 2022

इंडिया गेट

इंडिया गेट हे दिल्लीतील सुप्रसिद्ध ठिकाण आहे. इंडिया गेट हे युद्ध स्मारक असून दुसर्‍या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधण्यात आली आहे.

Credit: istock

अग्रसेन की बावडी

दिल्लीतील सुंदर वास्तूंपैकी एक अग्रसेन किंवा उग्रसेन की बावडी ही वास्तू आहे. बावडी म्हणजे या विहरीला १०८ पायर्‍या असून ही विहीर ६० मीटर लांब आणि १५ मीटर ऊंच आहे.

Credit: istock

कुतुब मिनार

कुतुब मिनार हे विजयी मनोरा आहे. कुतुब मीनार हे दिल्लीतील सर्वात उंच मीनार असून याची ऊंची ७२.५ मीटर आहे.

Credit: instagram

हुमायुन मकबरा

दिल्लीतील हुमायुन मकबरा ही अतिशय सुंदर वास्तू आहे. १९९३ साली ही वास्तू जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहे.

Credit: instagram

लाल किल्ला

शाहजहाने लाल किल्ला बनवला होता. ही एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असून २००७ साली लाल किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित झाली होती.

Credit: istock

अक्षरधाम मंदिर

अक्षरधाम मंदिर हे स्वामीनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. अक्षरधाम मंदिर हे जगातील सर्वात मोठे मंदिर असून गिनीज वर्ल्ड बूकमध्ये या मंदिराची नोंद झाली आहे.

Credit: istock

लोटस मंदिर

दिल्लीच्या नेहरु प्लेसमध्ये हे मंदिर आहे. या मंदिरात एकही मूर्ती नसून या ठिकाणी धर्मसंबंधित सर्व माहिती आहे.

Credit: istock

जामा मस्जिद

मुघल बादशहा शहजहानने ही मस्जिद बनवली होती. भारतातील सर्वात मोठ्या मशीदींपैकी एक जामा मस्जिद असून या मशीदीत एकाच वेळी २५ हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Credit: istock

गुरुद्वारा बंगला साहिब

१७८३ साली या वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. शीख धर्मीयांची पवित्र वास्तू असून ती खूप सुंदर आहे.

Credit: istock

पुराना किल्ला

मुघल बादशहा हुमायुन आणि शेर शहा सुरी यांनी हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्याशेजारी एक तलावही आहे. पर्यटक आवर्जून या किल्ल्या भेट देतात.

Credit: TOI

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय