आज रविवार 21 मे 2023. दरवर्षी 21 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो.
Credit: Times Network
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला 21 डिसेंबर 2019 रोजी मंजुरी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
Credit: Times Network
चहा दिनाच्या निमित्ताने चहाचा इतिहास, चहाचे अर्थकारण, चहा आणि जगाचे संबंध अशा वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास, चर्चासत्र यांचे आयोजन केले जाते.
Credit: Times Network
परदेशातून आणलेली चहाची रोपं भारतात रुजवण्यात आली. पुढे भारताच्या विशिष्ट भागांमधील वातावरणात चहाची शेती यशस्वी झाली. यानंतर हळू हळू चहा हे पेय भारतीयांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होते गेले. आज भारतातच नाही तर जगभर गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत कोट्यवधी नागरिक चहा पिणे पसंत करतात.
Credit: Times Network
पहिला चहा चीनमध्ये तयार झाला असे सांगतात. इंग्रजांनी चिनी चहा जगभर नेला. ज्या देशात इंग्रज गेले तिथे चहा पोहोचला. आज जगात चहाची निर्यात करणाऱ्यांमध्ये चीन पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
Credit: Times Network
चीनच्या युनान प्रांतातील शानमध्ये राजाला पिण्यासाठी उकळवलेले पाणी हवे होते. नोकर पाणी उकळवत होता तेव्हा जवळच असलेल्या रोपाची पानं पाण्यात पडली. पाण्याचा रंग बदलला. हे रंगीत पाणी राजाने बघितले आणि उत्सुकतेपोटी घोटभर पिण्याचा विचार केला. पाण्याची चव राजाला आवडली. इथेच पहिला पाणी आणि चहाची पाने यांच्या एकत्रिकरणातून चहा तयार झाला.
Credit: Times Network
परंपरागत चिनी चहाला काळानुरुप वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने विकसित केले गेले. यातूनच चहाची नवी रुपं जन्माला आली.
Credit: Times Network
चिनी व्यापाऱ्यांनी इंग्लंडसह युरोपमध्ये चहा नेला. पुढे चिनी आणि युरोपियन व्यापारी, यातही प्रामुख्याने इंग्रज व्यापारी यांनी चहा जगभर पसरवला. अवघ्या 3 हजार वर्षात चहा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. भारतात ईस्ट इंडिया कंपनीमुळे चहाची शेती आणि व्यापार सुरू झाला.