कांदा भारतीय पदार्थांमध्ये चवीसाठी तसेच पदार्थाचे प्रमाण वाढावे आणि तो जास्त लोकांना पुरावा यासाठीही वापरला जातो. भारतात कांदा वापरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक भारतीय दररोज कांदा खाणे पसंत करतात.
Credit: Times Network
लवकर खराब होतो
कांदा लवकर खराब होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन दीर्घकाळ कांदा सुरक्षित साठवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते.
Credit: Times Network
कांदा साठवणूक
योग्य खबरदारी घेतल्यास दीर्घकाळ कांदा सुरक्षित राहू शकतो
Credit: Times Network
अशी करा साठवणूक
कांदा कायम हवेशीर अर्थात व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी कोरडा राहील अशा प्रकारे साठवावा. कांद्याला पाण्याचा स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच गरज नसताना कांदा फुटणार नाही याची खबरदारी घ्यावी.