Feb 8, 2023

तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप, 11 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

Rohan Juvekar

मोठी जीवितहानी

तुर्कस्तानमध्ये 8754 आणी सीरियात 2470 जणांचा मृत्यू. मृतांची संख्या आणखी वाढण्याचा धोका. तसेच तुर्कस्तानमध्ये 6 हजारपेक्षा जास्त इमारती कोसळल्या आणि 3 विमानतळ ठप्प झाले.

Credit: Times Network

ढिगाऱ्यात मुलीचा जन्म

सीरियात भूकंपामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्यात एका गरोदर महिलेने मुलीला जन्म दिला. सध्या या मुलीची देखरेख एका हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.

Credit: Times Network

मृतदेह सापडत आहेत

भूकंप झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशी तुर्कस्तान आणि सीरियात अनेक ठिकाणी ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे

Credit: Times Network

ढिगाऱ्यातून जीवंत बाहेर येतील अशी आशा

मदतकार्य सुरू आहे. अधूनमधून ढिगाऱ्यात जीवंत नागरिक सापडत आहेत. यामुळे आपले नातलग वाचतील अशी आशा सुरक्षित असलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Credit: Times Network

वृद्ध महिलेला वाचवले

तुर्कस्तानमध्ये एका ढिगाऱ्यातून 2 तास प्रयत्न करून एका वृद्ध महिलेला वाचवण्यात आले

Credit: Times Network

तुर्कस्तानमध्ये आणीबाणी

तुर्कस्तानमध्ये 3 महिने आणीबाणी, ज्या भागांना भूकंपाचा फटका बसला त्या भागांमध्ये आणीबाणी लागू

Credit: Times Network

सर्वात मोठा भूकंप

तुर्कस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप असे या भूकंपाचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी वर्णन केले

Credit: Times Network

नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न

भूकंप झालेल्या भागांमध्ये नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

Credit: Times Network

अन्नपाण्याची तसेच विजेची टंचाई

तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंप झालेल्या भागांमध्ये अन्नपाणी तसेच विजेची टंचाई निर्माण झाली आहे

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस रुट, तिकीट, टाईमिंग, बुकिंग ते सर्वकाही जाणून घ्या

अशा आणखी स्टोरीज पाहा