महाराष्ट्राची पर्यटन स्थळे

Swapnil Shinde

Nov 10, 2022

​महाबळेश्वर आणि पाचगणी

महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशन आहेत. नयनरम्य निसर्ग सौंदर्य, मंत्रमुग्ध करणाऱ्या दऱ्या, निर्मळ तलाव आणि सुंदर स्ट्रॉबेरी फार्मसाठी ही दोन्ही शहर प्रसिद्ध आहेत.

Credit: Twitter

लवासा

लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे परिपूर्ण मिश्रण आहे

Credit: Twitter

​अलिबाग

अलिबाग हे कोकण किनारपट्टीवर वसलेले एक लहान शहर आहे, त्याला 'मिनी-गोवा' असेही म्हणतात. वालुकामय किनारे, स्वच्छ हवा, अनेक मंदिरे आणि किल्ले पहायला मिळतात

Credit: Twitter

​ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. वीकेंडला हे ठिकाण वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. या परिसरात दुर्मिळ वनस्पती आणि जीवजंतू आढळतात.

Credit: Twitter

भंडारा

भंडारा हे हिरवळ, धबधबे आणि पर्वतांनी वेढलेले ठिकाण आहे जे शहरवासीयांसाठी सुट्टीसाठी योग्य ठिकाण आहे.

Credit: Twitter

कोल्हापूर

निसर्गसौंदर्य, इतिहासाचा अमोघ ठेवा असलेलं शहर. विविधतेने नटलेले इथलं पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावतं. मराठ्यांची तिसरी राजधानी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरचे हे पर्यटनाचे वैभव अनुभवयाल हवं.

Credit: Twitter

नाशिक

नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक धार्मिक हिंदू शहर आहे. शहर परिसरामध्ये अनेक पौराणिक मंदिरे तसेच किल्ले, धबधबे आणि द्राक्षबागा आहेत.

Credit: Twitter

​लोणावळा

लोणावळा हे पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेले हिलस्टेशन आहे. अनेक धबधबे, तलाव आणि टेकड्या असलेले हे पर्यटन स्थळ पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे.

Credit: Twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: राजकीय नेते फॉर्च्युनर गाडीचा सर्वाधिक वापर का करतात?

अशा आणखी स्टोरीज पाहा