​भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथा सामना​

Swapnil Shinde

Mar 8, 2023

​जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम​

नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे आणि त्याची क्षमता सुमारे 1.25 लाख प्रेक्षक आहे.

Credit: Instagram

​जुने स्टेडियम पाडून​

जुने स्टेडियम पाडून हे नवीन स्टेडियम बांधण्यात आले असून त्याचे बांधकाम फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाले आहे.

Credit: Instagram

​63 एकरमध्ये ​

नरेंद्र मोदी स्टेडियम 63 एकरमध्ये पसरले असून ते तयार करण्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये लागले आहेत. या स्टेडियममधील मैदानाचा आकार 180 यार्ड X 150 यार्ड आहे

Credit: Instagram

​4 ड्रेसिंग रूम्स​

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आहेत. प्रत्येक कॉर्पोरेट बॉक्समध्ये 25 लोक बसण्याची क्षमता आहे. 4 ड्रेसिंग रूम्स असलेले हे जगातील पहिले स्टेडियम आहे.

Credit: Instagram

​३२ फुटबॉल स्टेडियम्सबरोबर​

या स्टेडियमचे क्षेत्रफळ ऑलिम्पिक आकाराच्या ३२ फुटबॉल स्टेडियम्सएवढे आहे.

Credit: Instagram

​11 खेळपट्ट्या​

हे जगातील एकमेव स्टेडियम आहे ज्यात 11 खेळपट्ट्या आहेत ज्या लाल आणि काळ्या मातीने बनवलेल्या आहेत. यासोबतच सरावासाठी सहा इनडोअर खेळपट्ट्याही बनवल्या आहेत.

Credit: Instagram

​चार एंट्री पॉइंट​

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चार एंट्री पॉइंट आहेत. म्हणजेच स्टेडियममध्ये जाण्यासाठी प्रेक्षकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.

Credit: Instagram

​पावसानंतर अवघ्या अर्ध्या तासात खेळ​

नरेंद्र मोदी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था उत्तम आहे. पावसानंतर अवघ्या अर्ध्या तासात खेळ सुरू होऊ शकतो. डे-नाईट सामन्यांसाठी येथे विशेष प्रकारचे एलईडी लाईटही लावण्यात आले आहेत.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लायनने शेन वॉर्नचा विक्रम मोडला, बनला आशियाचा नवा 'विदेशी बादशाह'

अशा आणखी स्टोरीज पाहा