क्रिकेटच्या विश्वातील आठ अजब गोष्टी

Amol Joshi

Sep 18, 2022

​अद्भुत भारत

भारत हा असा देश आहे ज्याने क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप जिंकून घेतले. 1983 मध्ये 60 ओव्हर, 2011 मध्ये 50 ओव्हर तर 2007 मध्ये 20 ओव्हर या फॉरमॅटमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकले.

Credit: Twitter

​एकाच दिवसात चार डाव

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 2000 साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीत एकाच दिवस चारही डाव आटोपले होते. त्यानंतर 11 वर्षांनी दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात असा प्रकार घडला होता.

Credit: Twitter

​एकमेव खेळाडू

इफ्तिखार अली खान पतौडी हे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी कसोटी खेळणारे एकमेव खेळाडू ठरले. हे बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचे आजोबा.

Credit: Twitter

​वाढदिवसाचा किस्सा

इंग्लंडचे माजी विकेटकीपर ॲलेक स्टीवर्ट यांचा जन्म 8-4-1963 या दिवशी झाला. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या करिअरमध्ये 8463 धावाच केल्या.

Credit: Twitter

​अमरनाथ यांची कमाल

भारतीय टीमचे माजी कर्णधार लाला अमरनाथ यांच्या नावे एक वेगळंच रेकॉर्ड आहे. अमरनाथ हे महान फलंदाज सर डॉन ब्रँडमन यांना हिट विकेट आऊट करणारे जगातील एकमेव गोलंदाज ठरले.

Credit: Twitter

​तुफानी बॉर्डर

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ॲलन बॉर्डर यांनी 1978 पासून 1994 पर्यंत एकूण 156 टेस्ट सामने खेळले. यातील 153 सामने ते सलग खेळले. त्यानंतर असं कुणीही करू शकलं नाही.

Credit: Twitter

​पहिल्या बॉलवर सिक्सर

वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल त्याच्या तुफानी खेळासाठी ओळखला जातो. टेस्ट मॅचच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारणारा तो आतापर्यंतचा एकमेव खेळाडू ठरला आहे.

Credit: AP

​दोन रॉबिन सिंह

भारताकडून रॉबिन सिंह नावाच्या दोन खेळाडूंनी टेस्टमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र दोन्ही रॉबिन सिंग तेवढाच एक कसोटी सामना खेळू शकले.

Credit: Twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: टेनिस कोर्टवर प्रेम, अशीच आहे रॉजर फेडररची love story