फेडररची रोमॅंटिक लव्हस्टोरी

Swapnil Shinde

Sep 18, 2022

पत्नीही टेनिसपटू

विशेष म्हणजे फेडररची पत्नी मिर्का ही टेनिसपटूही राहिली आहे. 2002 मध्ये एका स्पर्धेदरम्यान, मिर्काला पायाला दुखापत झाली, त्यानंतर तिला व्यावसायिक टेनिस कायमचे सोडावे लागले.

Credit: INSTAGRAM

पहिली भेट टेनिस कोर्टवर

टेनिसपटू असल्याने फेडररची पहिली भेट मिर्काशी 1997 मध्ये झाली होती

Credit: INSTAGRAM

ऑलिम्पिकमध्ये दोघांच्या भेटीगाठी

2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये दोघे एकमेकांना आवडू लागले. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या.

Credit: INSTAGRAM

टेनिस कोर्टवर पाहात राहिला

मिर्का स्वित्झर्लंड संघाच्या वतीने सिडनी ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली होती. ऑलिम्पिकदरम्यान एके दिवशी फेडरर टेनिस कोर्टवर उभा असताना मिर्काकडे नजर पडताच तो पाहत राहिला.

Credit: INSTAGRAM

9 वर्षे डेटिंगनंतर लग्न

अखेर जवळपास 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर फेडरर आणि मिर्काने 2009 मध्ये लग्न केले.

Credit: INSTAGRAM

​20 वर्षे दोघेसोबत

त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली मिर्का 20 वर्षांहून अधिक काळ त्याच्यासोबत आहे. फेडररला ती खूप प्रोत्साहन देते.

Credit: INSTAGRAM

जुळ्या मुलांचा पिता

2009 मध्ये पहिल्यांदा फेडरर जुलै 2009 मध्ये मिला रोझ आणि शार्लीन रिवा या जुळ्या मुलांचा पिता झाला.

Credit: INSTAGRAM

दुसऱ्यांदा गरोदर असताना

त्यानंतर काही वर्षांनी 2014 मध्ये, मिर्काने पुन्हा एकदा जुळ्या मुलांना (लिओ आणि लेनी) जन्म दिला.विशेष म्हणजे आठ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतरही ती फेडररला एका स्पर्धेत प्रोत्साहन देताना दिसली होती.

Credit: INSTAGRAM

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: महागड्या कारचा शौकीन आहे Hitman, रोहित शर्माचं Car कलेक्शन