Sep 19, 2022

या आहेत भारतीय क्रिकेटर्सच्या लकी चार्म गोष्टी

Archana Patkar

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सामन्याच्या दिवशी अनेक उपाय करत असतो. असं सांगितलं जात की तो सामन्याआधी कॉफी जरूर पितो. जेव्हा हिटमॅन बॅटिंगसाठी मैदानात उतरतो तेव्हा नेहमी उजवा पाय आधी टाकतो.

Credit: AP

सचिन तेंडुलकर

महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही एक खास सवय होती की जी तो कधीच विसरत नव्हता. सचिन नेहमी आपल्या डाव्या पायावर पहिल्यांदा पॅड बांधत होता. तो या गोष्टीला लकी समजत असे.

Credit: BCCL

वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला विना नंबरी जर्सी घालणे लकी वाटत असे. त्याने हा निर्णय अंकज्योतिष शास्त्राच्या सल्ल्याने घेतला होता.. सेहवाग आधदी ४४ नंबरची जर्सी घालत होता.

Credit: Twitter

झहीर खान

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा लकी रूमालावर विश्वास होता. तो प्रत्येक महत्त्वाच्या सामन्यादरम्यान पिवळ रूमाल स्वत:कडे ठेवत असे. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी केली आहे.

Credit: PTI

राहुल द्रविड

माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड फलंदाजीसाठी तयार होताना नेहमी आपल्या उजव्या पायावर थाय पॅड बांधत असे. याशिवाय द्रविड मालिकेतील पहिल्या सामन्यात नव्या बॅटने खेळत नसे.

Credit: PTI

सौरव गांगुली

माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचाही लकी चार्महोता. गांगुली जेव्हा मैदानावर उतरत असे तेव्हा आपल्या गुरूंचा फोटो जरूर ठेवत असे. सोबतच तो अंगठी आणि माळही घालत असे.

Credit: PTI

मोहम्मद अझरुद्दीन

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन नेहमी आपल्या गळ्यात काळे तावीज घालत असे. अझरुद्दीन जेव्हा फलंदाजी करत असे तेव्हा ते तावीज जर्सीबाहेर लटकत असे.

Credit: AP

You may also like

सांधेदुखीवरील स्वस्त उपचार
रोहित शर्माने १ मॅचमध्ये ठोकल्या होत्या ...

मोहिंदर अमरनाथ

माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांना लाल रूमाल विशेष पसंत होता. ते मैदानात उतरताना नेहमी लाल रूमाल आपल्या खिशात ठेवत असतं.

Credit: Twitter

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सांधेदुखीवरील स्वस्त उपचार

अशा आणखी स्टोरीज पाहा