Border-Gavaskar : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

Swapnil Shinde

Feb 9, 2023

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही सर्वात जास्त रन बनवण्याचा रेकाॅर्ड आहे. त्याने 34 टेस्ट मॅचमध्ये 3262 रन काढल्या. त्यामध्ये नाबाद 241 रनांची खेळी केली.

Credit: instagram

Ricky Ponting : रिकी पोंटिंग

ऑस्ट्रेलियाची रन मशीन म्हणून ओळखलेल्या रिकी पोंटिंग सर्वात जास्त रन बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 29 टेस्ट मॅचमध्ये 2555 रन बनवल्या आहे. त्यात आठ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे

Credit: instagram

Rahul Dravid : राहुल द्रविड़

राहुल द्रविडने 32 टेस्टमध्ये 2143 रन बनवल्या आहेत. त्यामध्ये 2 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

Credit: instagram

Michael Clarke : मायकल क्लार्क

ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियासाठी जबरदस्त योगदान दिले, त्याची कसोटी कारकीर्दही खूप प्रभावी होती. मायकेल क्लार्कने 22 सामन्यांत 2049 धावा केल्या. क्लार्कने नाबाद 329 धावांसह 7 शतके झळकावली.

Credit: instagram

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाकडून जर कोणी कंगारूच्या टीमला हैराण केले असेल, तर तो व्हीव्हीएस लक्ष्मण होता. त्याने 29 टेस्ट मॅचमध्ये 6 शतक आणि 12 अर्धशतकांसह एकूण 2434 रन केल्या.

Credit: instagram

Virender Sehwag : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सेहवागने एकूण 22 सामन्यात 1738 धावा केल्या आहेत.

Credit: instagram

Steve Smith : स्टीव स्मिथ

स्टीव्ह स्मिथच्या नावावर या मालिकेत अनेक विक्रम आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये 50 षटकार पूर्ण करण्यापासून फक्त एक षटकार दूर आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथने 92 कसोटीत 60.89 च्या सरासरीने 8647 धावा केल्या आहेत.

Credit: instagram

virat kohli : विराट कोहली

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. या खेळाडूने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1682 धावा केल्या आहेत.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

अशा आणखी स्टोरीज पाहा