भारत आणि श्रीलंका यांच्यात नवीन वर्षातील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. तेव्हा क्रिकेटच्या मैदानात रोहित शर्माला पाहून प्रत्येक जण अवाक् झाला.
प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत आहे. 'तो आधीपेक्षा स्लिम आणि फिट दिसत आहे.'
रोहित शर्मा एकेकाळी त्याच्या अनफिट बॉडीमुळे खूप ट्रोल झाला होता.
त्यानंतर त्याने व्यायाम आणि डाएटमध्ये असा बदल केला की लोक बघतच राहिले.
रोहितला कमी कॅलरी आहारासोबत रोज ५०० मिली संत्र्याचा रस घेणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरला. ज्यूसऐवजी रोज दोन संत्री खाल्ल्यानेही हा फायदा होऊ शकतो.
सफरचंदात पॉलिफेनॉल असते, ज्यामुळे ते लठ्ठपणाविरोधी (वजन कमी करणारे) गुणधर्म असलेले फळ बनते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे एक योग्य फळ आहे. दिवसातून २ सफरचंद खाणे फायदेशीर ठरू शकते.
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर डाळिंब तुमच्यासाठी हे काम सोपे करू शकते. खरं तर, डाळिंबात पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स, तसेच अँथोसायनिन्स, टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चरबी कमी करण्यास मदत करतात.
लठ्ठपणा कमी करणाऱ्या फळांच्या यादीत किवी व पपईचाही समावेश केला जातो. दररोज पपई किंवा किवी खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद