सारा तेंडुलकरचा पारंपारिक लूक, होतेय सर्वत्र चर्चा

Bharat Jadhav

May 25, 2022

​लाखो तरुणांची सारा आहे क्रश

भारताचा मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील एखाद्या अभिनेत्री इतकीच साराची लोकप्रियता आहे. लाखो तरुणांची सारा ही क्रश आहे.

Credit: Facebook

​सोशल मीडियावर सक्रिय

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

Credit: Instagram

न पाहिलेला मराठी लुक

यावेळी सारा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये दिसली. सारानं काठपदराची साडी नेसली होती, इतकंच नाही तर कपाळावर चंद्रकोरही होती. मराठमोळे दागिने, केसांत गजरा आणि नाकातल्या नथीने ती अतिशय सुंदर दिसत होती.

Credit: Facebook

​तेंडुलकर कुंटुंबीय लग्नसमारंभात सहभागी

सचिन तेंडुलकर आणि त्याचं कुटुंबिय जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभात सहभागी झाले होते. या लग्नसमारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Credit: Facebook

लग्नाला सचिन तेंडुलकरची आई हजेरी

लग्नाला सचिन तेंडुलकरची आई देखील हजर होती.

Credit: Facebook

​सारा बनली करवली

साराच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळत आहे. या लग्नसमारंभात सारा करवली होती असा अंदाज फोटोंवरून लावला जात आहे. कारण साडी नेसलेल्या साराच्या हातामध्ये मंगलकलश दिसत आहे. साराचा साडीमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करून गेला.

Credit: Facebook

लग्नसोहळ्यातील काही विधींमध्ये सचिन सहभागी

मुंबईतील जे डब्ल्यू हॉटेलमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात सचिन तेंडुलकरचे नवदांपत्याबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सचिनने यावेळी निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. लग्नसोहळ्यातील काही विधींमध्ये सचिनदेखील सहभागी झाला होता.

Credit: Facebook

​साराचा व्हाइट शूट

लग्नाच्या इतर फंक्शन्समध्येही सारा व्हाइट शूटमध्ये दिसली. यादरम्यान त्यांची इतर नातेवाईकांशी भेट झाली. सारा तिच्या अभ्यासानिमित्त बराच काळ लंडनमध्ये राहिलेली आहे.

Credit: Facebook

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मोबाईलवर 'बॅडमिंटन लीग' गेमची धूम