​स्टुअर्ट मयंतीच्या पहिल्या भेटीत झाला होता "बोल्ड"

Bharat Jadhav

Nov 23, 2022

​भारतीय क्रीडा वाहिन्यांचा चेहरा

मयंती लँगर हे भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. गेल्या 15-16 वर्षांपासून ती प्रत्येक मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडा वाहिन्यांचा चेहरा आहे. 2010 मध्ये फीफा वर्ल्ड कप या 2011 क्रिकेट वर्ल्ड कप किंवा आईपीएल या इंडियन सुपर लीग दिसली आहे.

Credit: Instagram

​फुटबॉल खेळ होता आवडीचा

अमेरिकेत शिकत असताना मयंतीला फुटबॉलची खूप आवड होती. ती त्यांच्या फुटबॉल संघाचीही सदस्य होती . यासह, तिला फुटबॉलशी संबंधित सर्व नियम आणि कायदे माहित होते. त्याच्या मदतीने, ती फिफा बीच फुटबॉलमध्ये सामील झाली आणि ती पाहुणे अँकर बनली.

Credit: Instagram

​क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीशी केले लग्न

मयंती लँगरने क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे. दोघांना एक मुलगाही आहे. स्टुअर्ट बिन्नी कर्नाटक, राजस्थान रॉयल्स आणि भारताकडून क्रिकेट खेळला आहे.

Credit: Instagram

​मयंती लँगर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची मुलगी

तिच्या वडिलांचे नाव लेफ्टनंट जनरल संजीव लँगर आहे. संयुक्त राष्ट्र संघातही त्यांनी कर्तव्य बजावले आहे. मयंतीने 2006 पासून क्रीडा पत्रकारितेत पाऊल ठेवले होते. सुरुवातीला ती अमेरिकेत काम करायची.

Credit: Instagram

​दोघांची प्रेमकहाणी आहे संपूर्ण फिल्मी

त्यांची पहिली भेट क्रिकेटच्या मैदानावर झाली. या भेटीने दोघांच्या नात्याचा पाया रचला गेला आणि पुढे दोघेही सात जन्माच्या बंधनात बांधले गेले.

Credit: Instagram

​पहिल्याच मुलाखतीतच बोल्ड झाला स्टुअर्ट

माजी भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी 2007 मध्ये इंडियन क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान मयंती लँगरला भेटले होते. त्या सामन्यात स्टुअर्ट बिन्नीने हैदराबाद हीरोज संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्या सामन्यात मयंती स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून काम करत होती. मॅचनंतर जेव्हा मयंती बिन्नीची मुलाखत घेण्यासाठी पोहोचली तेव्हा स्टुअर्ट तिच्याकडे बघतच राहिला.

Credit: Instagram

​रिलेशनशिपचे प्रश्न केल्यानंतर जुडले तार

मयंतीने फक्त बिन्नीची पहिली मुलाखत घेतली. या मुलाखतीत मयंतीने बिन्नी यांना त्यांच्या नात्याची माहिती विचारली. दरम्यान हा प्रश्न ऐकून बिन्नीचा चेहरा लाजेने लाल झाला. या मुलाखतीनंतरच दोघांच्या नात्याचा पाया रचला गेला.

Credit: Instagram

​2012 मध्ये लग्नगाठ बांधली

2007 मध्ये दोघांमध्ये प्रेम फुलले आणि 2012 मध्ये दोघांनी लग्न केले.

Credit: Instagram

28

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कतार विश्वचषक विजेत्यांना किती पैसे दिले जातील हे तुम्हाला माहिती आहे का?

अशा आणखी स्टोरीज पाहा